Do You Know : 'या' देशात पाहिले जातात सर्वाधिक पॉर्न व्हिडिओ? टॉप ५ मध्ये भारताचा समावेश
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Do You Know : 'या' देशात पाहिले जातात सर्वाधिक पॉर्न व्हिडिओ? टॉप ५ मध्ये भारताचा समावेश

Do You Know : 'या' देशात पाहिले जातात सर्वाधिक पॉर्न व्हिडिओ? टॉप ५ मध्ये भारताचा समावेश

Jan 09, 2025 11:56 AM IST

Most Porn Watching Countries: कोणत्या देशातील लोक सर्वाधिक पॉर्न व्हिडिओ पाहतात? जाणून घ्या.

कोणत्या देशातील लोक सर्वाधिक पॉर्न व्हिडिओ पाहतात? वाचा
कोणत्या देशातील लोक सर्वाधिक पॉर्न व्हिडिओ पाहतात? वाचा

Do you Know: इंटरनेटमुळे आपले जग खूप सोपे झाले आहे. गुगलवर काहीही सर्च केले की लगेच आपल्यासमोर येते. तरुणांसाठी इंटरनेट हे ऑक्सिजनसारखे झाले आहे. एखादा व्यक्ती न खाता पिता एक- दोन दिवस राहू शकतो. पण इंटरनेटशिवाय ते तासभरही राहणार नाहीत. मात्र, आता इंटरनेटचा दुरुपयोग केला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पॉर्न व्हिडिओ पाहिले किंवा डाउनलोड केले जात आहे. पॉर्नोग्राफीचीमुळे इतकी खोलवर आहेत की, ती इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचली आहे.

एका अहवालानुसार, ११ ते १६ वर्षे वयोगटातील ५३ टक्के तरुण पॉर्नोग्राफीच्या आहारी गेले आहेत. भारतही या बाबतीत मागे नाही. पॉर्न चित्रपट पाहणाऱ्या जगातील टॉप ३० देशांमध्ये भारताचे नाव देखील आहे. तर, मग कोणत्या देशात सर्वाधिक पॉर्न व्हिडिओ पाहिले जातात याबाबत जाणून घेऊयात.

पहिल्या क्रमांकावर ‘हा’ देश

२०२३ मध्ये फिलीपिन्स जगातील सर्वाधिक पॉर्न पाहणाऱ्या देशांच्या यादीत अव्वल स्थानावर होते. पॉर्नहबच्या अभ्यासानुसार, २०२१ मध्ये इतर देशांतील लोकांच्या तुलनेत फिलिपिनो लोकांनी सर्वाधिक पॉर्न व्हिडिओ पाहिले आहेत. याशिवाय, जपान, फ्रान्स, नेदरलँड, युक्रेनच्या लोकांपेक्षा इथले नागरिकही पॉर्न पाहण्यात जास्त वेळ घालवतात. येथील लोक इंटरनेटवर भेट दिल्यास सरासरी ११ मिनिटे ३१ सेकंद पॉर्न चित्रपट पाहतात.

दुसऱ्या क्रमांकावर कोण?

इनसाइडर मंकीच्या अहवालानुसार, पोलंड २०२३ मध्ये पॉर्न फिल्म पाहण्याच्या बाबतीत जगातील टॉप ३० देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. येथे सप्टेंबर १९९८ मध्ये कायद्यात बदल करून पॉर्नोग्राफी कायदेशीर करण्यात आली. पण १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना पॉर्न दाखवणे बेकायदेशीर आहे. याशिवाय, हिंसा आणि बलात्काराच्या दृश्यांसह पॉर्न फिल्म बनवणेही बेकायदेशीर आहे.

भारत कितव्या क्रमांकावर?

२०२३ च्या आकडेवारीनुसार, पॉर्न फिल्म पाहणाऱ्या जगातील टॉप ३० देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील वाढत्या लैंगिक गुन्ह्यांमागे पोर्नोग्राफी हे प्रमुख कारण असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे आणि १८ वर्षांखालील अनेक लोक पॉर्न व्हिडिओ पाहतात. भारत सरकारनेही आपल्या आयटी कायद्यात बदल करून पोर्नोग्राफीविरोधात पावले उचलली आहेत.

पॉर्न व्हिडिओ पाहण्यात हे देशही मागे नाहीत

पॉर्नहबने २०२४ मध्ये त्यांच्या वेबसाइटवर केलेल्या अभ्यासानुसार, अमेरिकन लोक पॉर्न पाहण्याच्या बाबतीत सर्वाधिक होते. अमेरिकेतील लोकांनी पोर्नहब साइटला सर्वाधिक भेट दिल्याचे या अभ्यासात सांगण्यात आले. येथे साइटला भेट देणाऱ्या लोकांची संख्या ३ हजार १७१ दशलक्ष होती. यानंतर इंडोनेशियातील पॉर्नहब साइटला ७६.५ मिलियन लोकांनी भेट दिली. यानंतर ब्राझील, फ्रान्स, फिलीपिन्स, जपान आणि कॅनडाचे लोक होते. या यादीत भारत नवव्या क्रमांकावर होता, जिथे २८४ दशलक्ष लोकांनी पॉर्नहबच्या साइटला भेट दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर