मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  H3N2 व्हायरस पसरत असताना कोरोनाही हळूहळू डोके वर काढतोय.. केंद्राच्या राज्यांना मार्गदर्शक सूचना

H3N2 व्हायरस पसरत असताना कोरोनाही हळूहळू डोके वर काढतोय.. केंद्राच्या राज्यांना मार्गदर्शक सूचना

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 11, 2023 11:14 PM IST

भारतातइंफ्लूएंजाचासब-टाइप एच3एन2च्या प्रकरणातवृद्धी होत असतानाच केंद्र सरकारने काही राज्यातकोविड-१९संक्रमण दरात होत असलेल्या वाढीबद्दलचिंता व्यक्तकरत यावर तत्काळ उपाय योजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.

कोरोना व्हायरस वाढत आहे
कोरोना व्हायरस वाढत आहे

भारतात इंफ्लूएंजाचा सब-टाइप एच3एन2 च्या प्रकरणात वृद्धी होत असतानाच केंद्र सरकारने काही राज्यात कोविड-१९ संक्रमण दरात होत असलेल्या वाढीबद्दल चिंता व्यक्त करत यावर तत्काळ उपाय योजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना इंफ्लूएंजा सारख्या आजारावर (आयएलआय) या गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (एसएआरआय) च्या प्रकरणात दिशानिर्देशांचे पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. राज्यांना म्हटले आहे की, औषधे व ऑक्सीजनचा पुरवठा सुनिश्चित करावा. कोविड-१९ आणि  इन्फ्लूएंजा विरुद्ध लसीकरणाबाबत तयारीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना इन्फ्लूएंझा सारखा आजार  किंवा गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) प्रकरणे म्हणून उपस्थित असलेल्या श्वसन रोगांच्या एकात्मिक देखरेखीसाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, राज्यांना औषधांची उपलब्धता आणि वैद्यकीय ऑक्सिजन, लसीकरण यासारख्या रुग्णालयातील तयारींचा आढावा घेण्याची विनंती करण्यात आली होती.

लहान मुले, वृद्धांना एच1एन1, एच3एन2 चा अधिक धोका - 
देशभरातील काही राज्यात व केंद्रशासित प्रदेशात अन्य आयएलआय आणि एसएआरआयमध्ये वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालय, विभाग आणि संबंधित संघटनांसोबत वर्तमान स्थितीची समीक्षा करण्यासाठी नुकत्याच एका बौठकीचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रयोगशाळात केलेल्या विश्लेषणात केलेल्या नमुन्यात इन्फ्लुएंजा ए (एच3एन2) विशेषरित्या  चिंतेचा विषय आहे. त्याचबरोबर मुले, वृद्ध आणि गंभीर आजाराने ग्रस्त लोकांमध्ये  एच1एन1,  एच3एन2 चा अधिक धोका आहे. केंद्रीय आरोग्य सचिव भूषण यांनी राज्यांना पत्र पाठवून म्हटले आहे की, या आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. 

सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाची गती गेल्या काही महिन्यांत लक्षणीयरीत्या मंदावली आहे. काही राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रेटमध्ये हळूहळू होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे, ज्याकडे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होत असताना आणि लसीकरण मोहिमेत उल्लेखनीय प्रगती होत असतानाही आपण सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच, चाचणी, ट्रॅक, उपचार, लसीकरण या धोरणावर लक्ष केंद्रित करून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

देशभरातील काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये इतर ILIs आणि SARI चा वाढता कल पाहता, संबंधित केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि संस्थांसोबत सद्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेण्यात आली.

WhatsApp channel

विभाग