मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बुरखा घालून महिला स्विमिंग पूलमध्ये उतरली; फ्रान्समध्ये प्रचंड कल्लोळ

बुरखा घालून महिला स्विमिंग पूलमध्ये उतरली; फ्रान्समध्ये प्रचंड कल्लोळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 20, 2022 02:26 PM IST

फ्रान्समध्ये महिलांच्या कपड्यांवरून आता नवा वाद सुरू झाला आहे. फ्रान्स सरकारनं घेतलेल्या एका निर्णयावरुन देशभरात प्रतिक्रिया उमटत आहेत.

फ्रान्समध्ये महिलांच्या पेहरावावरुन गदारोळ
फ्रान्समध्ये महिलांच्या पेहरावावरुन गदारोळ (HT)

सध्या फ्रान्समध्ये महिलांच्या कपड्यांवरुन जोरदार वाद सुरु आहे. त्यामध्ये सरकार आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप केल्यानं हा वाद आणखी चिघळत असल्याचं चित्र आहे. एका सरकारी जलतरण तलावात एका महिलेला बुरखा घालण्यास परवानगी दिल्यानंतर हा वाद सुरु झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फ्रान्समधील ग्रेनोबल शहरातल्या एका जलतरण तलावात मुस्लिम महिलेला बुरखा घालण्यासोबतच सर्व स्विमिंग सूट घालण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यावर फ्रान्स सरकारच्या एका मंत्र्यांनं याचा विरोध करत हा नियम आम्ही बदलणार असल्याचं सांगितलं.

काय असतो बुरखा?

मुस्लिम महिला या आपलं शरीर आणि केस झाकण्यासाठी काळ्या कलरचा पेहराव घालतात. त्याला बुरखा असं म्हणतात. यावरुन फ्रान्समध्ये सुरु असलेल्या वादाला काही लोकांनी इस्लामोफोबियाची किनार असल्याचं सांगितलं तर काही स्त्रीवादी आणि उजव्या विचारांच्या संघटनांनी बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

ग्रेनोबेलच्या महापौरांनी केली घोषणा...

गेल्या सोमवारी ग्रेनोबेलच्या अल्पाइन शहरात सर्वांना सरकारी जलतरण तलावात आवडीनुसार आणि पसंतीनुसार कपडे घालता येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यात काही महिलांनी बुरखा घालणं पसंत केलं. परंतु फ्रान्समध्ये आणि फ्रान्सच्या राज्यांमध्ये जलतरण तलावात एका विशिष्ट प्रकारचा पेहराव घालण्याची सक्ती असल्यानं हा नियम मोडल्याचा आरोप अनेक नेत्यांनी केला. त्यानंतर या शहराच्या महापौरांनी आपल्या नियमांवर ठाम राहत यासंदर्भातल्या मतदानात सहभाग घेतला.

विरोधी पक्षानं केला जोरदार विरोध

ग्रेनोबल शहराचे महापौर एरिक पिओल यांचा बुरख्यासंदर्भातल्या नियमावरुन अनेक लोकांनी विरोध केला आहे. पिओल हे फ्रान्समधील मोठे नेते मानले जातात. परंतु त्यांनी बुरख्यासंदर्भातला निर्णय बदलल्यानं लोकांनी त्यांच्याविरोधात टिकेची झोड उठवली.

जेव्हा पिओल यांनी हा मुद्दा सभागृहामध्ये उचलला असता त्यावर अध्यक्षांनी मतदान घेण्याची घोषणा केली. त्यात या नियमाच्या विरोधात २९ तर समर्थनात २७ मतं पडली. केवळ दोन मतांनी सरकारच्या या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. या प्रक्रियेनंतर 'महिला आणि पुरुषांना त्यांच्या आवडीनुसार कपडे घालता यायला हवं', असं यावेळी पिओल यांनी सांगितलं.

सत्तापक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी...

महिलांच्या बुरख्यावरुन आणि स्विमिंग सुटवरून आता फ्रान्समध्ये सत्तापक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होत आहे. त्याचबरोबर या वादात काही संघटनांनीदेखील उडी घेतल्यानं हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या