मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Matrimonial Site : पैसे घेऊनही नवरी का शोधून दिली नाही? कोर्टाने मॅट्रिमोनियल साइटवर ठोकला सहा पट दंड

Matrimonial Site : पैसे घेऊनही नवरी का शोधून दिली नाही? कोर्टाने मॅट्रिमोनियल साइटवर ठोकला सहा पट दंड

Jun 17, 2024 07:18 PM IST

kerala matrimonial site : न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, तक्रारदार युवक मॅट्रिमोनी वेबसाइटच्या अनेक पीडितांपैकी एक आहे. चेरथला येथील एका तरुणाने मे २०१९ मध्ये कंज्यूमर फोरममध्ये तक्रार केली होती.

कोर्टाने मॅट्रिमोनियल साइटवर ठोकला सहा पट दंड
कोर्टाने मॅट्रिमोनियल साइटवर ठोकला सहा पट दंड

केरळमधील एका जिल्हा ग्राहक न्यायालयाने एका मॅट्रिमोनी साइटला एका व्यक्तीसाठी नवरी शोधण्यात अपयशी ठरल्याबद्दल जबाबदार ठरवण्याबरोबरच २५ हजाराचा दंडही ठोठावला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने तक्रारदार व्यक्तीला त्याची फी व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण केरळमधील एर्नाकुलममधील आहे. येथे जिल्हा ग्राहक वाद निवारण फोरम (DCDRC) ने केरळ मॅट्रिमोनीला पीडित व्यक्तीला नुकसानभरपाई म्हणून २५,००० रुपये देण्याचा आदेश दिला आहे. 

तक्रारदार तरुणाने आरोप केला आहे की, मॅट्रिमोनी साइट त्याच्यासाठी नवरी शोधण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहे. बार अँड बेंचच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जिल्हा फोरमचे अध्यक्ष डीबी बीनू आणि फोरमचे सदस्य रामचंद्रन व्ही आणि श्रीविद्या टीएन वादात निकाल दिला की, केरळ मॅट्रिमोनी सेवा देण्यात कमी पडली आहे. त्यानंतर फोरमने १५ मे रोजी मॅट्रिमोनी साइटविरोधात आदेश मंजूर केला. 

न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, तक्रारदार युवक मॅट्रिमोनी वेबसाइटच्या अनेक पीडितांपैकी एक आहे. चेरथला येथील एका तरुणाने मे २०१९ मध्ये कंज्यूमर फोरममध्ये तक्रार केली होती. त्याने आरोप केला होता की, २०१८ च्या सुरुवातीला त्याने केरळ मॅट्रिमोनी साइटवर आपला बायोडाटा नोंद केला होता. त्यानंतर केरळ मॅट्रिमोनीचे प्रतिनिधी त्यांच्या घरी व ऑफिसमध्ये आले होते. त्यांच्याकडून तीन महिन्याच्या सदस्यतेसाठी ४,१०० रुपये घेतले होते. त्यावेळी त्यांना योग्य मुलगी शोधण्याचे आश्वासन दिले होते.

ट्रेंडिंग न्यूज

तक्रारदाराने म्हटले की, जानेवारी २०१९ मध्ये पैसे दिले होते. त्यानंतर त्याचा केरळ मॅट्रिमोनीशी कोणताही संपर्क झाला नव्हता. त्यानंतर तक्रारदाराने आपले शुल्क परत करण्याची मागणी केली. याची ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयात केरळ मॅट्रिमोनीने म्हटले की, तक्रारदाराचे रजिस्ट्रेशन क्लासिक पॅकेजमध्ये केले होते. जे अनेक प्रोफाइल पाहण्यासाठी आणि संपर्क करण्याची परवानगी देते.

मॅट्रिमोनी साइटने म्हटले की, त्यांची भूमिका एका मध्यस्थाची होती आणि सिस्टीमवर संभावित मेलची माहिती देण्यापर्यंत मर्यादीत होती. साइटने म्हटले की, वेबसाइटवर कोणत्याही प्रकारची माहिती ग्राहकांद्वारे स्वत: अपलोड केली जाते. केरळ मॅट्रिमोनी ग्राहकांना केवळ माहिती पुरवते. तक्रारदाराला नियम व अटी समजून सांगितल्या होत्या. 

केरळ मॅट्रिमोनीने कधीही सांगितले नव्हते की, ते तक्रारदाराच्या लग्नाची व्यवस्था करतील. अशा कोणत्याही गॅरेंटीचा त्यांनी पुरावा दाखवावा. फोरमला आढळले की, साइटजवळही काही पुरावे नव्हते की, त्यांनी ग्राहकाला कोणत्या सेवा दिल्या. त्यामुळे फोरमने केरळ मॅट्रिमोनीला आदेश दिला की, त्यांनी तक्रारदार तरुणाला व्याजासहित ४,१०० रुपये शुल्क परत करावे. त्याचबरोबर नुकसान भरपाई म्हणून २५ हजार रुपये आणि खटल्याचा खर्च ३००० रुपये अतिरिक्त द्यावे.

WhatsApp channel
विभाग