मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Congress President Election : काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी हे दोन नेते रिंगणात; तिसऱ्याचा अर्ज बाद

Congress President Election : काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी हे दोन नेते रिंगणात; तिसऱ्याचा अर्ज बाद

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 01, 2022 04:37 PM IST

काँग्रेस अध्यक्षपदासाठी काँग्रेसहायकमांडचे विश्वासू मल्लिकार्जून खर्गे यांच्याविरुद्ध काँग्रेसमधील दुसऱ्या गटाचेनेते शशी थरुर असा सामना रंगणार आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदाची (Congress president election) प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणुकीविषयी माहिती दिली. मधुसूदन मिस्त्री काँग्रेसच्या सेंट्रल इलेक्शन अथॉरिटीचे चेअरमन आहेच. मिस्त्री यांनी सांगितले की, एकूण २० अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये छाननीत ४ फॉर्म बाद करण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, अर्जावर सही व अन्य कारणांमुळे हे अर्ज नाकारण्यात आले होते. अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे.

गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याच्यावरून शह काटशहाचे राजकारण सुरु होते. ही निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडचे विश्वासू मल्लिकार्जून खर्गे यांच्याविरुद्ध काँग्रेसमधील दुसऱ्या गटाचे नेते शशी थरुर असा सामना रंगणार आहे. तिसरे उमेदवार झारखंडचे माजी कॅबिनेट मंत्री के. एन. त्रिपाठी यांचा अर्जबाद झाला आहे.

 

८ ऑक्टोबर रोजी चित्र होणार स्पष्ट -

मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले की, ८ ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. या दिवशी कोणाही नामांकण मागे न घेतल्यास निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. सध्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत दोन उमेदवार आमने-सामने आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे, यामुळे त्याच दिवशी निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या