Congress New Headquarter: ४६ वर्षानंतर काँग्रेस मुख्यालय २४ अकबर रोडवरून होणार शिफ्ट, उद्यापासून ‘हा’ असणार नवीन पत्ता
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Congress New Headquarter: ४६ वर्षानंतर काँग्रेस मुख्यालय २४ अकबर रोडवरून होणार शिफ्ट, उद्यापासून ‘हा’ असणार नवीन पत्ता

Congress New Headquarter: ४६ वर्षानंतर काँग्रेस मुख्यालय २४ अकबर रोडवरून होणार शिफ्ट, उद्यापासून ‘हा’ असणार नवीन पत्ता

Jan 14, 2025 11:04 PM IST

Congress New Headquarter: तब्बल ४६ वर्षांनंतर काँग्रेस पक्षाचे मुख्यालय स्थलांतरित होणार आहे. नवीन इमारत आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. ही पूर्णपणे कॉर्पोरेट स्टाईल आहे. यात काँग्रेसची ६ मजली इमारत आहे.

काँग्रेसने नवे मुख्यालय
काँग्रेसने नवे मुख्यालय

Congress New Headquarter : काँग्रेस पक्षाचे मुख्यालय १५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अधिकृतरित्या हलविण्यात येणार आहे. तत्पूर्वी २४ अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयातून काँग्रेसचा झेंडा खाली उतरवण्यात आला. ४६ वर्षापासून हे काँग्रेसचे मुख्यालय होते. काँग्रेसची नवी इमारत आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. ही पूर्णपणे कॉर्पोरेट स्टाईल आहे.  काँग्रेस मुख्यालयाची नवीन इमारत ६ मजली आहे.

१५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता काँग्रेसचे मुख्यालय ९ ए कोटला रोड येथे स्थलांतरित होणार आहे. १९७८ मध्ये वेंकटस्वामी यांच्या २४ अकबर रोड येथील घरी काँग्रेसचे मुख्यालय बांधण्यात आले. तेव्हापासून जवळपास ४७ वर्षे २४ अकबर रोड हे काँग्रेसचे मुख्यालय आहे. या मुख्यालयातून काँग्रेस पक्षाने १९८५ मध्ये ४१४ हून अधिक जागा जिंकल्या आणि २०१४ मध्ये ४४ जागा ही निचांकी खासदार संख्याही नोंदवली. 

काँग्रेसचे मुख्यालय ४६ वर्षांपूर्वी २४ अकबर रोड येथे बांधण्यात आले होते. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांनंतर १९७८ च्या सुरुवातीला काँग्रेसने या इमारतीला मुख्यालय बनवले.

९ ए कोटला रोड वरील काँग्रेसचे नवे मुख्यालय असलेल्या इंदिरा भवनाची पायाभरणी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २८ डिसेंबर २००९ रोजी केली होती आणि आता १५ जानेवारी २०२५ रोजी म्हणजेच उद्या त्याचे औपचारिक उद्घाटन होईल.

२४ अकबर रोडचा इतिहास -

अनेक किस्से आणि गुपितांचा साक्षीदार असलेला लुटियन्सकालीन बंगल्यातील मुख्यालय बुधवारी काही किलोमीटर अंतरावरील कोटला रोडवरील इंदिरा गांधी भवन या नव्या कार्यालयात जाईल.

अकबर रोड बंगल्यात एकेकाळी व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सर रेजिनाल्ड मॅक्सवेल राहत होते. १९६१ मध्ये आंग सान स्यू की या अल्पवयीन मुलीच्या आईची भारतात राजदूत म्हणून नेमणूक झाली होती. त्यावेळी आंग स्यू की केवळ १५ वर्षाच्या होत्या. त्या या बंगल्यात रहायला होत्या. आधुनिक सोयी-सुविधा आणि मोठे क्षेत्र ही काळाची गरज आहे, हे पक्षाचे जुने नेते आणि नवे नेतेही मान्य करतात, पण २४ अकबर रोडच्या मुख्यालयाशी निगडित भावनिक नाते दृढ राहील.

१९७८ च्या जानेवारीच्या थंडीच्या सकाळी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील फुटलेल्या काँग्रेसच्या २० कार्यकर्त्यांच्या गटाने पक्षाच्या आवारात प्रवेश केला आणि तेव्हापासून हे काँग्रेसचे मुख्यालय बनले. 

दिल्लीच्या मध्यभागी असलेला टाइप ७ चा बंगला, २४ अकबर रोड आंध्र प्रदेशचे राज्यसभेचे खासदार जी. वेंकटस्वामी यांना देण्यात आला होती, ज्यांनी तत्कालीन सत्ताधारी जनता पक्षाच्या प्रतिकाराच्या भीतीने इंदिरा गांधींपासून स्वत:ला दूर ठेवले होते. गेल्या काही वर्षांत १० जनपथ आणि २४ अकबर रोड यांचा अतूट दुवा निर्माण झाला. एकमेकांच्या शेजारी असलेले दोन परिसर सर्वात जुन्या पक्षाचे पॉवरहाऊस म्हणून काम करत होते आणि अनेक महत्त्वाच्या बैठकांचे यजमानपद भूषवत होते.

स्वातंत्र्यापूर्वी तत्कालीन अलाहाबाद येथील मोतीलाल नेहरू यांचे आनंद भवन हे काँग्रेस पक्षाचे मुख्यालय होते. १९४७ नंतर हा पक्ष नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात स्थलांतरित झाला.

१९६९ मध्ये इंदिरांच्या काँग्रेसने ७ जंतरमंतरवरील ताबा गमावला आणि काँग्रेसला पहिल्यांदा फुटीचा सामना करावा लागला. इंदिरा गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत एम. व्ही. कृष्णाप्पा यांच्या निवासस्थानी विंडसर प्लेस येथे पक्षाचे तात्पुरते कार्यालय सुरू केले. १९७१ मध्ये काँग्रेसचे कार्यालय ५ राजेंद्र प्रसाद रोड आणि तेथून १९७८ मध्ये २४ अकबर रोड येथे स्थलांतरित झाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर