मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nyay yatra : राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेचा आज पासून सुरू होणार झंझावात! ६७ दिवसांत १०० लोकसभा मतदारसंघांतून प्रवास

Nyay yatra : राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेचा आज पासून सुरू होणार झंझावात! ६७ दिवसांत १०० लोकसभा मतदारसंघांतून प्रवास

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 14, 2024 07:35 AM IST

Congress Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा झंझावात आज पासून सुरू होणार आहे. मणीपुर येथून या यात्रेला सुरुवात होणार आहे. कॉँग्रेस अध्यक्ष या यात्रेला हिरवा झेंडा दाखवून या यात्रेच्या प्रारंभ करणार आहेत.

Congress Nyaya yatra News
Congress Nyaya yatra News

Congress Bharat Jodo Nayay Yatra : काँग्रेसच्या न्याय यात्रेला आज रविवारपासून सुरुवात होणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्यायाशी संबंधित मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मणिपूरची राजधानी इंफाळजवळील थोबल येथून ही यात्रा सुरू होणार आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात ६७ दिवसांचा प्रवास करून ही यात्रा मुंबईत पोहचणार असून या ठिकाणी या यात्रेचा समारोप होईल. हा निवडणुकीचा प्रवास नसून देशाला न्याय मागण्याशी संबंधित असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आठवडाभर आधी सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या या यात्रेकडे लोकसभा निवडणुकीतील बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्यायाशी संबंधित मुद्यांवर चर्चा घडवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. भाजप आणि आरएसएस देशातील ज्वलंत मुद्यांवरुन लक्ष वळवून भावनिक मुद्द्यांचा राजकारनासाठी गैरवापर करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला.

Pandharpur news : पंढरपूर हळहळले! शेत तलावात पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारत जोडी यात्रेत आर्थिक विषमता, ध्रुवीकरण आणि हुकूमशाहीचे मुद्दे मांडले होते, तर भारत जोडो न्याय यात्रा देशातील जनतेला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर २०२२ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली होती. त्यांच्या १३० दिवसांच्या पदयात्रेत त्यांनी १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ७५ जिल्हे आणि ७६ लोकसभा मतदारसंघातून ४,०८१ किलोमीटरचे अंतर कापले होते.

Mumbai RailwayMegablock : मुंबईकरांनो आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडतांना वेळापत्रक तपासा

खर्गे दाखवणार हिरवी झेंडी

पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे १४ जानेवारीला इंफाळजवळून या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही न्याय यात्रा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांचाही समावेश होऊ शकतो.

६७ दिवसांत १५ राज्यांतून करणार प्रवास

लोकसभा निवडणुकीपूर्वी काढण्यात येणारी ही यात्रा ६७ दिवसांत १५ राज्ये आणि ११० जिल्ह्यांतून जाणार असल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे. या काळात ही यात्रा सुमारे १०० लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान अंदाजे ६,७०० किलोमीटरचे अंतर कापले जाईल. हा प्रवास बहुतांशी बसने केला जाणार आहे, पण काही ठिकाणी चालतही प्रवास असणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाईल.

महिला, तरुण आणि वंचित समाजातील लोकांशी चर्चा

पक्ष संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी नुकतेच सांगितले होते की, या यात्रेदरम्यान देशातील महिला, तरुण आणि वंचित समाजातील लोकांशी चर्चा काँग्रेसनेते करणार आहे. ही यात्रा मणिपूरमधून सुरू करण्यामागचे कारण विचारले असता वेणुगोपाल म्हणाले की, हा देशाचा महत्त्वाचा भाग आहे आणि पक्षाला या ईशान्येकडील राज्यातील लोकांच्या जखमा भरून काढण्याची प्रक्रिया सुरू करायची आहे. मणिपूरमध्ये ३ मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून कुकी आणि मैतेई समुदायातील लोकांमधील जातीय संघर्षात २०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ६० हजारांहून हून अधिक लोक बेघर झाले आहेत. काँग्रेसने भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन विरोधी पक्ष इंडिया अलायन्समधील आपल्या मित्रपक्षांच्या नेत्यांना केले आहे.

WhatsApp channel

विभाग