Parliament Session : राहुल गांधींवरील कारवाईवरून संसदेत गदारोळ, दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित-congress mps condemned modi govt on rahul gandhi disqualification in parliament session today ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Parliament Session : राहुल गांधींवरील कारवाईवरून संसदेत गदारोळ, दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित

Parliament Session : राहुल गांधींवरील कारवाईवरून संसदेत गदारोळ, दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित

Mar 27, 2023 12:31 PM IST

Congress Party Protest : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह पक्षाच्या खासदारांनी संसदेत काळे कपडे घालून येत मोदी सरकारचा निषेध केला आहे.

Congress Party Protest Against Rahul Gandhi Disqualification
Congress Party Protest Against Rahul Gandhi Disqualification (HT)

Congress Party Protest Against Rahul Gandhi Disqualification : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेसच्या खासदारांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला आहे. गौतम अदानी आणि राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या प्रकरणावरून काँग्रेसचे खासदार आक्रमक झाले होते. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी चार वाजेपर्यंत आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून भाजपा आणि काँग्रेसचे खासदार संसदेच्या दोन्ही सभागृहात आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

लोकशाहीसाठी काळा अध्याय- मल्लिकार्जुन खर्गे

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह पक्षातील अनेक खासदारांनी काळे कपडे घालून मोदी सरकारचा निषेध केला. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे बोलताना म्हणाले की, गौतम अदानी आणि राहुल गांधींच्या अपात्रतेच्या प्रकरणावर मोदी सरकार चर्चा करण्यास तयार नाही. संसदेतील कामकाज ठप्प व्हावं, ही सत्ताधारी भाजपचीच इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवलग मित्राची काळी कृत्य उघड होत असल्यामुळं भाजपला कामकाजाचीही भीती वाटायला लागल्याचं सांगत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकशाहीसाठी काळा अध्याय असल्याचा आरोप भाजपवर केला आहे. याशिवाय काँग्रेस जेपीसी चौकशीच्या मागणीवर ठाम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसच्या बैठकीला १७ विरोधी पक्षांची हजेरी...

संसदेतील कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या दालनात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यात काँग्रेस, द्रमुक, सपा, जेडीयू, बीआरएस, सीपीएम, आरजेडी, एनसीपी, सीपीआय, आप आणि टीएमसीसह देशातील १७ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी जे लोक सोबत येतील, त्यांचं स्वागत केलं जाईल, असं खर्गे यांनी बैठकीत म्हटलं आहे.

Whats_app_banner