प्रजनन करत राहायला आम्ही काही ससे आहोत का?; RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या ‘त्या’ विधानावर महिला खासदार संतापल्या!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  प्रजनन करत राहायला आम्ही काही ससे आहोत का?; RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या ‘त्या’ विधानावर महिला खासदार संतापल्या!

प्रजनन करत राहायला आम्ही काही ससे आहोत का?; RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या ‘त्या’ विधानावर महिला खासदार संतापल्या!

Dec 03, 2024 11:47 AM IST

काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी म्हणाल्य़ा की, वयोवृद्ध आई-वडील नोकरी करून मुलांचा सांभाळ करत आहेत, अशी स्थिती आहे. अशा स्थितीत अधिक मुले जन्माला घालण्यास सांगितले जात आहे. आपण ससे आहोत का जे प्रजनन करत राहतील?'

मोहन भागवत
मोहन भागवत (Snehal Sontakke)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कुटुंब वाढवण्याच्या केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. मोहन भागवत यांचा मी आदर करते, पण मुलांच्या संगोपनाचा त्यांना काय अनुभव आहे? अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत, मुलं मोठी झाल्यावर त्यांना रोजगार मिळत नाही. लोकांना अधिक मुलांची गरज कशासाठी आहे?  "आम्ही ससे आहोत का जे प्रजनन करत राहतील? कोणताही पुरुष आपल्या मुलीचे लग्न बेरोजगार पुरुषाशी करायला तयार नाही. तरुणांना नोकऱ्या नाहीत. ते सगळ्यांची काळजी कशी घेतील? त्यांच्याकडे पैसे नाहीत. 

'वयोवृद्ध आई-वडील नोकरी करून मुलांचा सांभाळ करत आहेत, अशी स्थिती आहे. अशा तऱ्हेने त्यांना अधिक मुले जन्माला घालण्यास सांगितले जात आहे. आम्ही ससे आहोत का जे प्रजनन करत राहतील?", असा सवाल करत त्यांनी विचारले की, ज्यांना असे करण्यास सांगितले गेले आहे ते किती मुलांचे संगोपन करू शकतात? त्यांना किती अनुभव आहे? हे आम्हाला माहित आहे. काँग्रेस महिला नेत्याने अन्नभेसळ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींचा उल्लेख करत म्हटले की, कोणी आजारी पडल्यास रुग्णालयात उपचारांचा खर्च खूप जास्त होतो. प्रत्येकासाठी ही सोपी गोष्ट नाही.

परिवार वाढववण्याबाबत काय म्हणाले मोहन भागवत -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित करणारे मोठे विधान केले. एखाद्या समाजाचा लोकसंख्या वाढीचा दर २.१ च्या खाली गेला तर तो समाज आपोआप नष्ट होईल. नागपूर येथील 'कथाले कुलसंमेलना'त बोलताना भागवतम्हणाले की, कुटुंब हा समाजाचा भाग आहे आणि प्रत्येक कुटुंब हे एक घटक आहे. लोकसंख्येत होणारी घट ही चिंतेची बाब आहे, कारण लोकसंख्या विज्ञान सांगते की लोकसंख्येचा दर २.१ च्या खाली गेला तर तो समाज नष्ट होईल. कोणीही त्याचा नाश करणार नाही, तो स्वत:चा नाश करेल. १९९८ किंवा २००२ च्या सुमारास आपल्या देशाचे लोकसंख्या धोरण ठरविण्यात आले होते, त्यात लोकसंख्या वाढीचा दर २.१ टक्क्यांपेक्षा कमी नसावा, असे म्हटले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर