मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  केरळमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेची विटंबना; आरोपी राहुल गांधींच्या कार्यालयातील कर्मचारी

केरळमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेची विटंबना; आरोपी राहुल गांधींच्या कार्यालयातील कर्मचारी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 19, 2022 08:47 PM IST

केरळमध्ये महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयातच हा प्रकार घडला आहे.

केरळमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेची विटंबना
केरळमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेची विटंबना

वायनाड (केरळ) – केरळमध्ये महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कार्यालयातच हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वायनाडमधील कार्यालयात दोन महिन्यांपूर्वीही घटना घडली होती.त्यावर आता कालपेट्टा पोलिसांनी कारवाई करत चार जणांना अटक केली आहे. यात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाच समावेश आहे.

काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी २ जण काँग्रेसचे कार्यकर्ते असून ते राहुल गांधी यांच्या वायनाडमधील कार्यालयात काम करत होते. अन्य दोघेही पक्षाचे कार्यकर्ते आहेत. महात्मा गांधींच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर हे कृत्य स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकत्यांनी केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

राहुल गांधी यांच्या कार्यालयात भिंतीवर महात्मा गांधी यांचा फोटो होता. २४ जून रोजी या कार्यालयामध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकत्यांनी या कार्यालयात प्रवेश केला आणि कार्यालयाची तोडफोड केली होती.

त्यामुळे या तोडफोडीमागे राज्यातील सीपीआय एम सरकारचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तर आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी म्हटले की, के.आर. अवस्थी यांना त्यांच्या कार्यालयातून या आधीच कमी करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही.

IPL_Entry_Point

विभाग