मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मध्य प्रदेशात काँग्रेसला भगदाड पडणार; कमलनाथ यांच्यासोबत २२ आमदार? मनीष तिवारीही देणार धक्का!

मध्य प्रदेशात काँग्रेसला भगदाड पडणार; कमलनाथ यांच्यासोबत २२ आमदार? मनीष तिवारीही देणार धक्का!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 18, 2024 06:11 PM IST

Kamalnath will Join BJP : दिग्गजकाँग्रेसी नेतेआणि माजी मुख्यमंत्री कमलनाथयांच्यानंतर काँग्रेस खासदार मनीष तिवारीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Kamalnath will Join BJP
Kamalnath will Join BJP

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ भाजपमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरदारपणे सुरू असतानाच आता काँग्रेसला आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वृत्त आहे की, काँग्रेस खासदार मनीष तिवारी भाजपमध्ये सामल होऊ शकतात. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू हे की, पंजाबमधील एका लोकसभा सीट बाबत पेच निर्माण झाला असून भाजपने याबाबत अजून सहमती दाखवली नाही. याबाबत येत्या दोन-चार दिवसात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दिग्गज काँग्रेसी नेतेआणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यानंतर काँग्रेस खासदार मनीष तिवारीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तिवारी भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. दरम्यान मनीष तिवारी यांच्या कार्यालयाने या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, या अफवा"आधारहीन" आणि"निराधार"आहेत.


मनीष तिवारी कार्यालयाकडून स्पष्टीकरण तेव्हा आले जेव्हा सूत्रांनी म्हटले होते की, काँग्रेसखासदारबीजेपीच्या संपर्कात आहे व भाजपच्या चिन्हावर लुधियाना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. दरम्यान काँग्रेस खासदाराच्या कार्यालयाने म्हटले की, त्यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा निराधार आहेत.

मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथआणि त्यांचा मुलगानकुलनाथ बीजेपीमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेदरम्यान मध्य प्रदेशकाँग्रेसचे अनेक आमदार रविवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. आमदारांची संख्या ६ असून तेकमलनाथ यांचे समर्थक आहेत.

छिंदवाडामधील ९ वेळा खासदार व सध्या या मतदारसंघातील आमदारही यामध्ये सामील आहेत. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत निराशाजनक प्रदर्शनानंतर काँग्रेसने मोठे फेरबदल करत प्रदेशाध्यक्ष बदलले होते.

कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेसने नुकतीच झालेली मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली होती, तेच कमलनाथ आता भाजपमध्ये प्रवेश का करत असल्याची चर्चा आहे. कमलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करताना काँग्रेसला मोठं भगदाड पाडण्याच्या तयारीत असून त्यांनी त्यादृष्टीने तयारीही केल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीट वाटपाचे अधिकार कमलनाथ यांच्याकडेच होते. त्यामुळे काँग्रेसचे जे काही आमदार निवडून आले आहेत, त्यातील बहुतांश आमदार कमलनाथ समर्थक आहेत. या आमदारांना फोडणं, कमलनाथ यांच्यासाठी फारसं कठीण नाही. काँग्रेसचे ६३ पैकी २२ आमदार कमलनाथ यांच्यासोबत जाण्यास उत्सुक असल्याचं समजते. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point