मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ‘कोणत्याही देशाला द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या राष्ट्रपती मिळू नयेत’, काँग्रेस नेत्याची टीका
द्रौपदी मुर्मू
द्रौपदी मुर्मू

‘कोणत्याही देशाला द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या राष्ट्रपती मिळू नयेत’, काँग्रेस नेत्याची टीका

06 October 2022, 16:12 ISTShrikant Ashok Londhe

काँग्रेस नेते आणि माजी खासदार उदीत राज यांनी ट्वीट करत म्हटले आहे की,  कोणत्याही देशाला द्रौपदी मुर्मू (draupadi murmu) यांच्यासारख्या राष्ट्रती मिळू नयेत. चमचेगिरीची पण हद्द असते.उदीत राज यांच्या विधानानंतर भाजपाकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

काँग्रेस नेते आणि माजी खासदार उदीत राज यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, कोणत्याही देशाला द्रौपदी मुर्मू (draupadi murmu) यांच्यासारख्या राष्ट्रती मिळू नयेत. चमचेगिरीची पण हद्द असते. ७० टक्के लोक गुजरातचं मीठ खातात असं त्या म्हणतात. स्वत: मीठ खाऊन आयुष्य घालवलं, तरच यांना कळेल असे म्हटले आहे. उदीत राजयांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंबंधी केलेल्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या या विधानानंतर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही त्यांच्या या वक्तव्याची दखल घेतली असून, माफी मागण्यास सांगितलं आहे. दरम्यान, उदीत राज यांनी स्पष्टीकरण देताना हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उदीत राज यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की “कोणत्याही देशाला द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या राष्ट्रती मिळू नयेत. चमचेगिरीची पण हद्द असते. ७० टक्के लोक गुजरातचं मीठ खातात असं त्या म्हणतात. स्वत: मीठ खाऊन आयुष्य घालवलं, तरच यांना कळेल.

 

उदीत राज यांच्या विधानानंतर भाजपाकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. ही आदिवासी विरोधी मानसिकता असल्याची टीका भाजपाने केली आहे.

दरम्यान उदीत राज यांनी वाद वाढू लागल्यानंतर आपल्या व्यक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं असून हे आपलं वैयक्तिक मत असून, पक्षाचा याच्याशी काही संबंध नसल्याचं सांगत सारवासारव केली आहे. उदित राज म्हणाले की, द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी आणि प्रचार आदिवीसांच्या नावेच करण्यात आला होता. याचा अर्थ त्या आता आदिवासी नाहीत असा होत नाही. जेव्हा अनुसूचित जाती/जमातीमधील एखादी व्यक्ती उच्च पदावर पोहोचल्यानंतर आपल्या समाजाकडे दुर्लक्ष करत मूक बनते तेव्हा मला वेदना होतात.

 

विभाग