Rahul Gandhi Sonipat : राहुल गांधी झाले अस्सल शेतकरी, भात लावणी करत ट्रॅक्टरही चालवला
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi Sonipat : राहुल गांधी झाले अस्सल शेतकरी, भात लावणी करत ट्रॅक्टरही चालवला

Rahul Gandhi Sonipat : राहुल गांधी झाले अस्सल शेतकरी, भात लावणी करत ट्रॅक्टरही चालवला

Jul 08, 2023 12:52 PM IST

Rahul Gandhi In Sonipat : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची मनमोकळ्या गप्पा मारत शेतात ट्रॅक्टरही चालवला आहे.

Rahul Gandhi Sonipat Haryana Visit
Rahul Gandhi Sonipat Haryana Visit (HT)

Rahul Gandhi Sonipat Haryana Visit : भारत जोडो यात्रा संपल्यानंतर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हरयाणा, राजस्थान, दिल्ली आणि पंजाब या राज्यांकडे लक्ष केंद्रित केलं आहे. राहुल गांधी सातत्याने या राज्यांचे दौरे करत असून शेतकरी, आदिवासी, शेतमजूर यांसारख्या विविध समाजघटकांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी समजून घेत आहे. सध्या राहुल गांधी हरयाणातील सोनिपत जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी सोनिपत येथील एका शेतकऱ्यांच्या थेट शेताला भेट दिली. त्यावेळी राहुल गांधींनी धानाच्या शेतात ट्रॅक्टर चालवत तांदळाची लागवड केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांच्यासोबत परिसरातील शेतकरी उपस्थित होते. राहुल गांधी यांच्या या दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यावरून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर निघाले असता ते अचानक हरयाणातील सोनिपत जिल्ह्यातील बरोदा या गावात थांबले. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसोबत भात लागवड केली. तसेच भात शेतीत ट्रॅक्टरही चालवला. भात शेती केल्यानंतर राहुल गांधी यांनी परिसरातील शेतकऱ्यांची चर्चा केल्यानंतर त्यांच्या अडीअचडणी समजून घेतल्या.

त्याचबरोबर हरयाणात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्याचं आश्वासन दिलं. यापूर्वी राहुल गांधी यांनी पंजाबमधील ट्रक चालकांसोबत वेळ घालवत त्यांच्या समस्या समजून घेतल्या होत्या. तसेच डिलीव्हरी बॉयचं काम करणाऱ्या तरुणांच्या गटाचीही राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. त्यानंतर आता राहुल गांधी हे अस्सल शेतकरी झाल्याने त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या टीकेवरून सूरतमधील कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. सूरत कोर्टाने दिलेल्या शिक्षेविरोधात राहुल यांनी गुजरात हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु हायकोर्टाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावल्याने त्यांची खासदारकी रद्दच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. परंतु महाराष्ट्रासह देशभरात राजकीय समीकरणं बदलत असताना राहुल गांधी सामान्यांसोबत वेळ घालवत असल्याने अनेकांनी त्यावर तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर