मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hath Se Hath Jodo: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर प्रियंका गांधींचे 'हाथ से हाथ' जोडो अभियान

Hath Se Hath Jodo: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर प्रियंका गांधींचे 'हाथ से हाथ' जोडो अभियान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 06, 2022 12:48 PM IST

hath se hath jodo abhiyan : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर प्रियंका गांधी हाथ से हाथ जोडो अभियान सुरू करणार आहेत. २६ जानेवारी २०२३ पासून सुरू होणारे हे अभियान दोन महिने चालेल.

राहुल-प्रियंका
राहुल-प्रियंका

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने आता 'हाथ से हाथ जोडो' अभियान आखले आहे. कांँग्रेस नेते राहुल गांधी श्रीनगरला पोहोचून प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीला तिरंगा फडकावू शकतात. या यात्रेनंतर पक्ष नव्या प्रचारात उतरण्यासाठी रुपरेखा तयार करत आहे. या यात्रेचा मुख्य चेहरा प्रियंका गांधी वाड्रा असणार असल्याचे बोलले जात आहे. तर जाणून घेऊया कशी असणार यात्रा.

'हाथ से हाथ जोडो'अभियान त्रिस्तरीय असेल -
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, भारत जोडोयात्रेनंतर काय होईल, पाठपुरावा काय असावा, असा सल्ला सर्व सदस्यांनी दिला. त्यासाठी ‘हाथ से हाथ जोडो’ मोहीम हा एक विशेष कार्यक्रम तयार करण्यात आला आहे,ही त्रिसूत्री योजना आहे. हे तीन स्तरांवर केले जाईल, ब्लॉक आणि बूथ स्तरावर यात्रा, जिल्हा स्तरावर अधिवेशने आणि राज्य स्तरावर मेळावे घेण्यात येतील.

काय असेल योजना -
या यात्रेच्या माध्यमातून विशेषत: महिला, तरुण आणि समाजातील प्रत्येक घटकाला काही ना काही संदेश दिला जाणार असल्याची माहिती रमेश यांनी दिली. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल ब्लॉक आणि बूथ स्तरावरही संदेश देणार आहेत.

कधी सुरू होणार अभियान -
प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीपासून हे अभियान सुरू होणार असून यात्रा पूर्ण होण्यास दोन महिने लागतील, असे काँग्रेस नेत्याने सांगितले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, वेणुगोपाल, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री या प्रचारात सहभागी होणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. प्रियांका राज्यांच्या राजधान्यांमध्ये'महिला मार्च'चे नेतृत्व करणार आहेत.

भारत जोडो यात्रेचीताजी स्थिती -
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेला ८९ दिवस उलटले आहेत.या यात्रेने आतापर्यंत ८ राज्यांतील ३८ जिल्हे व्यापले आहेत. सध्या ही यात्रा काँग्रेसशासित राजस्थान राज्यातील झालावाडमध्ये आहे. यात्रेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, अजून १०४१ किमीचा प्रवास बाकी आहे. भारत जोडो यात्रेने आतापर्यंत ३५०० किलोमीटरचा प्रवास केला आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या