मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रेत राडा! जयराम रमेश यांच्या गाडीवर हल्ला, पाहा Video

Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रेत राडा! जयराम रमेश यांच्या गाडीवर हल्ला, पाहा Video

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 21, 2024 07:17 PM IST

Bharat Jodo Nyay Yatra Assam : जयराम रमेश यांच्या कारवर तसेच 'भारत जोडो न्याय यात्रेत' सामील माध्यमांच्या प्रतिनिधींवर रविवारी आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Bharat Jodo Nyay Yatra Assam
Bharat Jodo Nyay Yatra Assam

आसाममधून जात असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेवर हल्ला झाला आहे. काँग्रेसने दावा केला आहे की, वरिष्ठ नेते जयराम रमेश यांच्या कारवर तसेच'भारत जोडो न्याय यात्रेत ' सामील कॅमेरामनसोबत रविवारी आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात यात्रा आसाममध्ये आली आहे. बिस्वंत जिल्ह्यातून सोनितपूरहून नागांवकडे जाताना यात्रेवर हल्ला झाला. ही घटना राहुल गांधी यांच्या नागांव जिल्ह्यातील कालियाबोरमध्ये एका रॅलीला संबोधत करण्यापूर्वी घडली.

काँग्रेस पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी येण्यापूर्वी त्यांच्या मार्गावर भाजप समर्थक रॅली काढत होते. त्याचवेळी भारत जोडो न्याय यात्रेतील काही गाड्या तेथून जात होत्या. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून काही वाहनांची तोडफोड करण्यात ली तसेच माध्यम प्रतिनिधींवर हल्ला केला गेला.


अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) च्या संचार समन्वयक महिमा सिंह यांनी एका वृत्त संस्थेला सांगितले की, परिसरात भाजपचा एक कार्यक्रम होत होता. याचा व्हिडिओ घेण्यासाठी काही माध्यम कर्मचारी आपल्या वाहनातून उतरले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांनी एका व्लॉगरचा कॅमेरा परत देण्यास नकार दिला.

 

जयराम रमेश यांचे ट्विट -

या घटनेवर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे,काही वेळापूर्वी सुनीतपूरच्या जुमुगुरिहाट येथे भाजपच्या लोकांनी माझ्या कारवर हल्ला केला आणि गाडीच्या काचांवर लावलेले भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकर्सही फाडले. हल्लेखोरांनी स्टिकरवर पाणी फेकले आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या विरोधात घोषणा दिल्या ,असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.

 

आम्ही कसेबसे तेथून बाहेर पडलो. असले काम आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा करत आहेत. पण आम्ही घाबरलो नाही आणि लढत राहू, असेही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, या घटनेबाबत अद्याप भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही

WhatsApp channel