EVM नकोच..! सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, काँग्रेस देशपातळीवर चालवणार अभियान
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  EVM नकोच..! सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, काँग्रेस देशपातळीवर चालवणार अभियान

EVM नकोच..! सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, काँग्रेस देशपातळीवर चालवणार अभियान

Nov 26, 2024 05:44 PM IST

बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने देशव्यापी मोहिमेची घोषणा केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, निवडणुका केवळ मतपत्रिकेतून व्हाव्यात, अशी आमची इच्छा असून त्यासाठी भारत जोडा यात्रेच्या धर्तीवर देशभरात मोहीम राबवली जाईल.

राहुल गांधी मल्लिकार्जुन खर्गे
राहुल गांधी मल्लिकार्जुन खर्गे (PTI)

ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका न घेता बॅलेट पेपरच्या माध्यमातून देशभरातील निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी काँग्रेसने देशव्यापी मोहिमेची घोषणा केली आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी ही घोषणा केली. निवडणुका केवळ मतपत्रिकेने व्हाव्यात, अशी आमची इच्छा असून त्यासाठी भारत जोडा यात्रेच्या धर्तीवर देशभर आत मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खर्गे म्हणाले की, ओबीसी, एससी, एसटी आणि दुर्बल घटकांनी पूर्ण ताकदीनिशी जी मते दिली आहेत ती वाया जात आहेत. आमची मागणी आहे की, सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात. ईव्हीएम मशीन त्यांना आपल्या घरात ठेवू द्या. अहमदाबादमध्ये बरीच गोदामे आहेत, त्यामध्ये नेऊन यंत्रे ठेवावीत. आमची एकच मागणी आहे की, निवडणुका बॅलेट पेपरद्वारे व्हाव्यात. तसे केले तर या लोकांना कळेल की ते किती पाण्यात आहेत.

आमच्या पक्षाने एक मोहीम सुरू करण्याची घोषणा केली असून सर्व पक्षांनी ही मोहीम एकत्र राबवली पाहिजे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारत जोडो यात्रेसारखी मोहीम देशभर राबवणार आहोत. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी जातीय जनगणनेचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीय जनगणनेला घाबरतात. पण समाजातील प्रत्येक घटकाला आपला वाटा हवा आहे आणि ते आपला हक्क मा गत आहे. सत्ताधाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे.

खर्गे म्हणाले की, जर तुम्हाला खरोखरच देशात एकता हवी असेल तर द्वेष पसरवणे थांबवावे लागेल. इतकंच नाही तर संविधान दिनाच्या निमित्ताने मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेत यावर दोन दिवस चर्चा व्हावी, अशी मागणीही केली. यामुळे लोकांना राज्यघटना आणि त्याचे संरक्षण कसे करायचे याची जाणीव होईल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणकीनंतर ईव्हीएम पुन्हा चर्चेत -

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला आहे. पुन्हा निवडणुका घ्याव्यात आणि मतपत्रिकेद्वारे मतदान झाले तरच योग्य निकाल येईल, असे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. इतकंच नाही तर शरद पवार यांनी यावेळी ईव्हीएमबाबतही शंका उपस्थित केली आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने ईव्हीएमबाबतच्या शंका वारंवार फेटाळून लावल्या आहेत.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर