Rahul Gandhi : ‘काँग्रेस १०० हून अधिक घरे बांधणार’, वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींची मोठी घोषणा-cong to build over 100 houses in landslide hit wayanad announces rahul gandhi ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : ‘काँग्रेस १०० हून अधिक घरे बांधणार’, वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींची मोठी घोषणा

Rahul Gandhi : ‘काँग्रेस १०० हून अधिक घरे बांधणार’, वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींची मोठी घोषणा

Aug 02, 2024 08:43 PM IST

Rahul Gandhi on Wayanad : केरळमध्ये यापूर्वी एकाही भागात अशी दुर्घटना घडली नाही आणि दिल्लीतही हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

Congress leaders Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra in Wayanad. (ANI)
Congress leaders Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra in Wayanad. (ANI)

Wayanad landslides : वायनाडमध्ये निसर्गाचा प्रकोप झाला असून भूस्खलनात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून तितकेच लोक जखमी आहेत. त्याचबरोबर शेकडो लोक बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.  या दुर्घटनेनंतर देशभरातून वायनाडमध्ये मदतीचा ओघ सुरू झाला आहे. गुरुवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाडला भेट देत भूस्खलनग्रस्तांशी संवाद साधला. यादरम्यान राहुल गांधी यांनीया नैसर्गिक आपत्तीत बेघर झालेल्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.  वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस १०० हून अधिक घरेबांधून देणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

वायनाडमध्ये काँग्रेस १०० हून अधिक घरे बांधणार असल्याची घोषणा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. केरळमध्ये यापूर्वी एकाही भागात अशी दुर्घटना घडली नसून दिल्लीतही हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेस नेते सध्या वायनाडमधील मदत छावण्यांना भेट देत आहेत, जिथे तीन मोठ्या भूस्खलनामुळे ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून असंख्य घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

राहुल गांधी म्हणाले, मी दोन दिवसांपासून इथं आहे. मी काल म्हटल्याप्रमाणे ही भयंकर शोकांतिका आहे. काल आम्ही घटनास्थळी गेलो होतो. आम्ही छावण्यांमध्ये गेलो, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. आज आम्ही प्रशासन आणि पंचायतीसोबत बैठक घेतली. त्यांनी किती जीवितहानी अपेक्षित आहे, किती घरांचे नुकसान झाले आहे आणि त्यांची रणनीती काय आहे, याची माहिती दिली, असे राहुल गांधी म्हणाले.
 


आम्ही सर्व प्रकारची मदत करण्यासाठी आलो आहोत, असे आम्ही म्हटले आहे. काँग्रेस कुटुंबाला येथे १०० हून अधिक घरे बांधण्याची इच्छा आहे. मला वाटते की, केरळने एका भागात अशा प्रकारची शोकांतिका पाहिली नाही आणि मी दिल्लीत आणि इथल्या मुख्यमंत्र्यांकडेही हा मुद्दा उपस्थित करणार आहे की ही एक वेगळ्या पातळीची शोकांतिका आहे आणि त्याला वेगळ्या प्रकारे ट्रीट केले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.

भूस्खलनामुळे झालेला विनाश पाहून वेदना होत आहेत आणि ज्या भावना आहेत तशाच भावना मला जाणवत आहेत, असे लोकसभेचे खासदार गुरुवारी म्हणाले होते १९९१ मध्ये त्यांचे वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा त्यांना वाटले.



वायनाडमधून लोकसभेच्या उमेदवार म्हणून जाहीर झालेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासमवेत त्यांनी विविध शिबिरांना भेटी दिल्या आहेत. भूस्खलनात सुमारे ३५० इमारतींचे नुकसान झाले होते. खडतर भूभाग आणि अवजड उपकरणांची कमतरता यासह अनेक आव्हानांमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. लष्कर, नौदल आणि एनडीआरएफच्या जवानांसह १६०० बचाव कर्मचारी बचावकार्यात गुंतले होते.