मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला संघर्ष, आतापर्यंत ४० दहशतवाद्यांचा खात्मा

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला संघर्ष, आतापर्यंत ४० दहशतवाद्यांचा खात्मा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 28, 2023 08:00 PM IST

Manipur Violence : घरांना आग लावल्याप्रकरणी व नागरिकांवर गोळीबार प्रकरणात सामील ४०सशस्त्रदहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला आहे.

Manipur Violence
Manipur Violence

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी रविवारी सांगितले की, घरांना आग लावल्याप्रकरणी व नागरिकांवर गोळीबार प्रकरणात सामील ४० सशस्त्र दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला आहे. मणिपूरमध्ये रविवारी सहाहून अधिक ठिकाणी झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही टिप्पणी केली आहे.

राज्य सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, आता झालेला संघर्ष दोन समुदायामध्ये झाला नसून कुकी दहशतवादी व सुरक्षा दलांमध्ये झाला आहे.सिंहयांनी म्हटले की, सशस्त्र दहशतवाद्यांनी एके-४७ आणि एम-१६ तसेच स्नायपर रायफलच्या माध्यमातून नागरिकांवर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

यावेळी मुख्यमंत्री सीएम एन बीरेन सिंह यांनी सुरक्षा यंत्रणा आणि मणिपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती दिली. सिंह म्हणाले की, दहशतवादी अत्याधुनिक शस्त्रांनी हल्ले करत होते. दहशतवादी समूहाचे लोक अनेक गावांमध्ये घुसून घरं जाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे लष्कर आणि अन्य सुरक्षा दलांनी गोळीबार सुरू केला.

 

दहशतवादी नि:शस्त्र नागरिकांवर हल्ले करून तोडफोड करण्याचा प्रयत्न करत आहेत.चकमकी दोन समुदायांमध्ये नसून कुकी दहशतवादीआणि सुरक्षा दलांमध्ये आहेत. मणिपूरमध्ये हिंसा कमी व्हायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत.

WhatsApp channel

विभाग