होय, मीच दिले होते हल्ल्याचे आदेश! हिजबुल्लाहवरील पेजर हल्ल्याची इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिली जाहीर कबुली
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  होय, मीच दिले होते हल्ल्याचे आदेश! हिजबुल्लाहवरील पेजर हल्ल्याची इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिली जाहीर कबुली

होय, मीच दिले होते हल्ल्याचे आदेश! हिजबुल्लाहवरील पेजर हल्ल्याची इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिली जाहीर कबुली

Nov 11, 2024 10:22 AM IST

benjamin netanyahu accepted pager attack : हिजबुल्लाहवर झालेल्या लेबनॉनमध्ये झालेल्या पेजर हल्ल्याला मान्यता दिल्याचे इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने जाहीरपणे कबूल केले आहे.

होय, मीच दिले होते हल्ल्याचे आदेश! हिजबुल्लाहवरील पेजर हल्ल्याबाबत इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिली जाहीर कबुली
होय, मीच दिले होते हल्ल्याचे आदेश! हिजबुल्लाहवरील पेजर हल्ल्याबाबत इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिली जाहीर कबुली (REUTERS)

benjamin netanyahu accepted pager attack : इस्रायल सध्या विविध आघाड्यांवर लढत  आहे. गाझामध्ये हमास विरोधात तर लेबनॉनमध्ये  हिजबुल्लावर लष्करी कारवाई सुरू आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्ये लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी टॉकीमध्ये स्फोट झाले होते. या स्फोटात हिजबुल्लाने अनेक दहशतवादी मारले गेले होते तर अनेक जण जखमी झाले होते. हा हल्ला इस्रायलने केला असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, इस्रायलने याची कबुली दिली नव्हती. मात्र, हे हल्ले माझ्याच आदेशाने झाले असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिली आहे. 

लेबनॉनवर झालेल्या पेजर आणि वॉकी टॉकी हल्ल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाने मान्यता दिल्याचे इस्रायलने प्रथमच जाहीरपणे सांगितले आहे. रविवारी इस्रायलच्या पंतप्रधानांनी जाहीरपणे या बाबत कबुली दिली आहे. सप्टेंबरमध्ये हिजबुल्लाहवर झालेल्या पेजर हल्ल्याला आपणच मान्यता दिली होती, त्यानंतर लेबनॉनमध्ये शेकडो पेजर आणि वॉकीटॉकीचा स्फोट झाला होता. या हल्ल्यात हिजबुल्लाहचे ४० हून अधिक दहशतवादी आणि सहकारी ठार झाले होते, तर ३ हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. यामुळे दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. 

लेबनॉनमध्ये सप्टेंबरमहिन्यात पेजर व वॉकी टॉकीमध्ये झालेल्या स्फोटानंतर हिजबुल्लाहने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले होते.  पण  इस्रायलने या हल्ल्याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. इराणसमर्थित हिजबुल्लाहचे या हल्लामुळे कंबरडे मोडले होते. कारण पेजर हे त्यांच्या सांभाषणाचे मुख्य माध्यम होते. अशा तऱ्हेने पेजरचा स्फोट झाल्याने लेबनॉनसह इराणमध्ये देखील या हल्ल्याची दहशत पसरली होती.  याचा बदला घेतला जाईल अशी धमकी हिजबुल्लाहने इस्रायलला दिली होती. 

नेतन्याहू यांचे प्रवक्ते ओमर दोस्त्री यांनी एएफपी वृत्तसंस्थेला या हल्ल्यांबाबत माहिती देतांना सांगितले की, पंतप्रधान नेतन्याहू यांनी रविवारी लेबनॉनमधील पेजर ऑपरेशनला हिरवा कंदील दिला होता.  

इस्रायलच्या हल्ल्याला चोख उत्तर 

गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर दिले तसेच गाझा पट्टीत मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे. या नंतर  लेबनॉनमधील हिजबुल्लाहने सातत्याने रॉकेट आणि ड्रोनने इस्रायलवर हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने पेजर हल्ला करत हिजबुल्लाहची  दळणवळण व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त केली.  इस्रायली तंत्रज्ञान लक्षात घेऊन हिजबुल्लाहने मोबाइल आणि आधुनिक उपकरणांचा वापर करण्याऐवजी पेजर आणि वॉकीटॉकीचा वापरकरण्यावर भर दिला होता. मात्र, याच साधनांना इस्रायलने लक्ष करत दूरबसून अनेक दहशतवाद्यांना संपवलं. 

स्फोटांनंतर हिजबुल्लाहची यंत्रणा  कमकुवत झाली.  त्याचा परिणाम असा झाला की नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण केल्यानंतर लगेचच  हिजबुल्ला प्रमुखाला ठार मारण्याचे  आदेश दिले. आधीच सज्ज असलेल्या इस्रायली सैन्याने एकाच हल्ल्यात हिजबुल्ला प्रमुख नसरल्लाह याला ठार मारले. 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर