viksit bharat sampark : निवडणूक जाहीर होताच मोदी सरकारचे व्हॉट्सॲपवर मेसेज, विरोधकांची आयोगाकडे तक्रार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  viksit bharat sampark : निवडणूक जाहीर होताच मोदी सरकारचे व्हॉट्सॲपवर मेसेज, विरोधकांची आयोगाकडे तक्रार

viksit bharat sampark : निवडणूक जाहीर होताच मोदी सरकारचे व्हॉट्सॲपवर मेसेज, विरोधकांची आयोगाकडे तक्रार

Updated Mar 20, 2024 09:40 AM IST

viksit bharat sampark whatsapp messages : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. असे असतांना मोदी सरकार तर्फे विकसित भारतचे मेसेज करण्यात येत आहेत. ही तक्रार पोल पॅनलच्या 'CVigil' मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे प्राप्त झाली आहे.

निवडणुक जाहीर होताच मोदी सरकारचे व्हॉट्सॲपवर मेसेज, विरोधकांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
निवडणुक जाहीर होताच मोदी सरकारचे व्हॉट्सॲपवर मेसेज, विरोधकांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

viksit bharat sampark whatsapp messages : लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच भाजप सरकारने आदर्श आचारसंहितेचे (MCC) उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, चंदीगड यांनी "विकास भारत संपर्क" च्या नावाखाली मोठ्या संख्येने व्हॉट्सॲप मेसेजेस पाठविण्यात येत आहेत. या मेसेजमध्ये केंद्र सरकारच्या कामांची माहिती देऊन जाहिरात आणि प्रचार करण्यात येत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. दरम्यान आता या प्रकरणी निवडणूक आयोग काय कारवाई करणार या कडे लक्ष लागून आहे.

Maharashtra Weather update : विदर्भात आजही गारपीटीचा इशारा; 'या' जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट; पुण्यात तापमान होणार वाढ

केंद्र सरकारच्या अनेक योजनांची माहिती देणारे मेसेजेस विकसित भारतच्या नावाखाली मोठ्या संख्येने नागरिकांना पाठवण्यात येत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर अशा प्रकारचे मेसेजेस कसे काय पाठवले जाऊ शकतात. हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एका अधिकृत निवेदनानुसार, तक्रारीची चौकशी केल्यानंतर, निवडणूक योगाने जिल्हा माध्यम प्रमाणन आणि देखरेख समिती मार्फत चौकशी करण्यात आली. या चौकशीत आचारसंहितेच्या उल्लंघनाचे प्रथमदर्शनी पुरावे मिळाले आहेत. गेल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. ही तक्रार पोल पॅनलच्या 'CVigil' मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे निवडणूक आयोगाला मिळाली होती. या प्रकरणावरील अधिकृत निवेदनात तक्रारदाराचा उल्लेख नाही.

Pune Drugs racket : मेफेड्रोन तस्करी पुन्हा मोठी कारवाई! पुणे, दिल्लीत छापेमारीत १६ लाखांचे ड्रग्स जप्त

या निवेदनात म्हटले आहे की, एका सरकारी विभागाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सरकारच्या कामाची माहिती देणारे मेसेजेस पाठवण्यासाठी सोशल मीडिया, विशेषत: व्हॉट्सॲपचा वापर केल्याचे दिसते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, मुख्य निवडणूक अधिकारी, चंदीगड यांनी योग्य कारवाईसाठी हे प्रकरण ECI कडे पाठवले आहे.

 

'विकास भारत संकल्प' नावाच्या व्हेरिफाईड व्हॉट्सॲप अकाउंटवरून पंतप्रधान मोदींचे संदेश मोठ्या संख्येने लोकांना पाठवले गेले आहे. त्यात लिहिले आहे की, "हे पत्र पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारच्या विकास भारत संपर्क केंद्रामार्फत पाठवण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांत देशातील ८० कोटींहून अधिक नागरिकांनी थेट या योजनांचा लाभ घेतला आहे. भारत सरकार आणि भविष्यातही आम्ही तुम्हाला भेटत राहू. विकसित भारताचा संकल्प पूर्ण

करण्यासाठी तुमचा पाठिंबा आणि तुमच्या सूचना महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तुम्ही योजनांबाबत तुमची मते लिहावीत ही विनंती, असा हा मेसेज पाठवला जात आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर