कंपनीने नोकरीवरून काढल्याच्या रागातून महिला एचआर हेडचा भररस्त्यात विनयभंग
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कंपनीने नोकरीवरून काढल्याच्या रागातून महिला एचआर हेडचा भररस्त्यात विनयभंग

कंपनीने नोकरीवरून काढल्याच्या रागातून महिला एचआर हेडचा भररस्त्यात विनयभंग

Updated Jun 10, 2024 03:57 PM IST

Girl Molestion in Noida : एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिला एचआर हेडचा त्यात कंपनीत काम करणाऱ्या दोन तरुणांनी विनयभंग व गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

महिला एचआर हेडचा भररस्त्यात विनयभंग
महिला एचआर हेडचा भररस्त्यात विनयभंग

दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिला एचआर हेडचा विनयभंग व गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकणात त्याच कंपनीत काम करणाऱ्या दोन तरुणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेपासून आरोपी फरार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.  

नोएडा पोलीस ठाणे सेक्टर-१२६ चे प्रभारी निरीक्षक प्रमोद कुमार सिंह यांनी सांगितले की, पोलिसात दाखल तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, ती सेक्टर-१२६ मधील एका कंपनीत एचआर हेड पदावर कार्यरत आहे.

प्रमोद कुमार सिंह यांनी पीड़ितेने दाखल केलेल्या तक्रारीच्या हवाल्याने सांगितले की, महिला एचआर हेडने काही दिवसापूर्वी कंपनीत कार्यरत आर्यन त्यागी आणि मोनित गोस्वामी यांना नोकरीकडून काढून टाकले होते. पीडितेने सांगितले की, त्याच दिवशी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास कंपनीतून ग्रेटर नोएडा येथील आपल्या घरी परतत होती. त्याचवेळी कोटक महिंद्रा बँकेच्या चौकात आर्यन आणि मोनितने तिच्याशी गैरवर्तन करत तिची छेड काढली.

पोलिसांनी सांगितले की, तेथे उपस्थित लोकांनी याचा विरोध केल्यानंतर दोन्ही आरोपी तिला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देत तेथून पसार झाले. पोलीस घटनास्थळाच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहे.

पुण्यात अल्पवयीन मावस बहिणींवर सामूहिक बलात्कार! -

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील परगाव कारखाना येथील एका गावात दोन अल्पवयीन मावस बहीणींवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मुलींचा व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल देखील केले आहे. या प्रकरणी मुलींच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यावर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवधूत राजू पंचरास, कुणाल कैलास बोऱ्हाडे, महेश तांबे व दोन अल्पवयीन मुले अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकुण ५ जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर