कंबोडियामध्ये एक में एक वेदनादायी घटना समोर आली आहे. एक व्यक्ती मगरींच्या पिंजऱ्यात पडला त्यानंतर पिंजऱ्यातील सर्व मगरी त्याच्यावर तुटून पडल्या. सांगितले जात आहे की, व्यक्ती एका लाकडाच्या सहाय्याने एका मगरीला मागे ढकलत होता. मात्र तोल जाऊन तो मगरींच्या पिंजऱ्यातच पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
काय आहे प्रकरण -
ही घटना कंबोडियामधील सिएम रीप शहरातील आहे. येते राहणारा ७२ वर्षीय लुआन नावाच्या व्यक्तीची मगरींची फर्म आहे. तेथे मोठ्या प्रमाणात मगरी आहेत. एका मगरीने अंडी दिली होती व लुआन नावाचा व्यक्ती त्या मगरीला काठीच्या सहाह्याने हटवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी मगरीने लुआनची काठी तोंडात पकडून त्याला असा झटका दिला की, लुआन मगरींच्या पिंजऱ्यात जाऊन पडला.
पिंजऱ्यात ४० मगरी होत्या व लुआन खाली पडताच सर्व मगरी त्याच्यावर तुटून पडल्या. मगरींनी लुआनच्या शरीराचे तुकडे-तुकडे केले. लुआनच्या शरीराचे जे तुकडे मिळाले आहेत, त्यावर मगरींच्या दातांचे निशाण आहेत. त्याचबरोबर शरीराचे काही अवयव मिळालेही नाहीत. कंबोडियामध्ये २०१९ मध्येही अशीच घटना घडली होती. दोन वर्षाच्या मुलीला मगरींनी आपली शिकार बनवले होते.
कंबोडियामध्ये मगरींची अंडी, कातडी आणि मांसासाठी मगरींचे पालन केले जाते. विशेष करून सिएम रीप शहरात मोठ्या संख्येने मगरींच्या फर्म आहेत.