मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जवान जिंदा है.. शहीद कर्नलच्या लहान मुलाने लष्करी वर्दी घालून पित्याला दिला निरोप, सर्वांचे डोळे पाणावले, VIDEO

जवान जिंदा है.. शहीद कर्नलच्या लहान मुलाने लष्करी वर्दी घालून पित्याला दिला निरोप, सर्वांचे डोळे पाणावले, VIDEO

Sep 15, 2023 04:17 PM IST

Colonel Manpreet last rites : अनंतनाग येथे शहीद झालेल्या कर्नल मनप्रीत सिंग यांच्या मुलाने लष्करी वर्दी परिधान करून आपल्या शहीद पित्याला सॅल्यूट करून अंतिम निरोप दिला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले.

Colonel Manpreet last rites
Colonel Manpreet last rites

जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या कर्नल मनप्रीत यांच्या पार्थिवावर मोहाली येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी कर्नल मनप्रीत यांच्या मुलाने परिधान केलेल्या लष्करी गणवेशाने उपस्थितांचे डोळे पाणावले. त्यांच्या लहान मुलाने लष्करी वर्दी परिधान करून आपल्या शहीद पित्याला सॅल्यूट करून अंतिम निरोप दिला. यावेळी शदीह कर्नल मनप्रीत अमर रहेच्या घोषणाबाजीने आसमंत दणाणून गेला.

कर्नल मनप्रीत सिंग यांच्या मुलाने शहीद पित्याला लष्करी गणवेश परिधान करत शेवटची सलामी दिली. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओत लहान मुलगा शहीद पित्याला सॅल्यूट करत शेवटची सलामीकरताना दिसत आहे.या लहान मुलाच्या शेजारी त्याची लहान बहीणही दिसत आहे. लष्करी वर्दीत मुलाने शहीद पित्याला सॅलूट करताच उपस्थितांना अश्रू अनावर झाले.

ट्रेंडिंग न्यूज

शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांचे पार्थिव मोहालीतील मुल्लानपूर येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांच्या कुटुंबात त्यांची आई, पत्नी, दोन वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. कर्नल मनप्रीत यांच्या मुलाने त्यांना सलामी दिली आणि अखेरचा निरोप दिला.

तीन महिन्यापूर्वी कर्नल मनप्रीत एक महिन्याच्या सुट्टीवर घरी आले होते. त्यांच्या पत्नीने सांगितले की, दोन दिवसाला त्यांचे फोनवरू बोलणे होत होते. मात्र बुधवारी कॉल केल्यानंतर त्यांनी म्हटले की, सध्या एकाऑपरेशनवर जात आहे, पुन्हा कॉल करतो. त्यांच्या वडिलांनी सांगितले की, कर्नल मनप्रीतच्या मुलांना समजणे कठीण आहे की, त्यांचे वडील आता या जगात नाहीत.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर