मध्य प्रदेशमधील सत्ताधारी भाजपचे गुना मतदारसंघातील आमदारांनी एक अजब विधान केले आहे. भाजप आमदार पन्नालाल शाक्य यांनीप्रधानमंत्री कॉलेज ऑफ एक्सीलेंसच्या उद्घाटन समारंभात विद्यार्थ्यांना सल्ला दिला की, 'या कॉलेजच्या पदव्या घेऊन काही होणार नाही, मोटरसायकिलपंक्चरचे दुकान सुरू करा, ज्यामुळे कमीत कमी उदरनिर्वाह तर होईल.'मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी समारंभाचे उद्घाटन केले.
भाजप आमदार पन्नालाल शाक्य यांनी म्हटले की, मी जे बोलणार आहे, ते विज्ञान व गणिताच्या फॉर्म्युल्याने सांगेन ते समजून घ्या. ही जी महाविद्यालये आहेत, शिक्षण संस्था आहेत या काही कंप्रेशर हाउस नाहीत. ज्यामध्ये डिग्रीच्या हिशोबाने हवा भरली जाईल आणि ते सर्टिफिकेट घेऊन जातील. वास्तवात शिक्षण संस्था अशा असतात ज्यांचे“ढाई अक्षर पढ़े सो पंडित होय,पोथीपढ़-पढ़ जगमुआ पंडित भया न कोय”
त्यांनी म्हटले की, नालंदा विद्यापीठ होते. या कॉलेजमध्ये तर १८ हजार विद्यार्थी आहेत. मात्र त्यामध्ये १२ हजार होते व १२०० शिक्षक होते. मात्र ११ लोकांनी ते विद्यापीठ जाळले होते. १२ हजार केवळ विचार करत राहिले की, मी एकटा काय करणार. त्यामुळे हिंदुस्तानचे ज्ञान संपले.
सर्वात आधी पंचतत्व वाचवण्यासाठी प्रयत्न करा, ज्यापासून आपले शरीर बनले आहे. जल,वायु, अग्नि, आकाश, पृथ्वी. आज पर्यावरणाची समस्या गंभीर बनली आहे. प्रदूषण वाढल्याने लोक चिंतित आहे. मात्र यावर कोणता उपाय निघत नाही.
आमदाराने म्हटले की, आज आपण प्रधानमंत्री श्रेष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन करत आहोत. माझे तुम्हाला सांगणे आहे की, केवळ एक बोध वाक्य लक्षात घ्या, 'या कॉलेजच्या डिग्रीने काहीच होणार नाही. मोटरसायकल पंक्चरचे दुकान उघडा, ज्यामुळे कमीत कमी आपला उदरनिर्वाह तर चालेल.
पाण्याबाबात संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे. पाणी टंचाई, प्रदूषणाबाबत कोणीही पुढे येऊन काम करण्यास तयार नाही. झाडे लावण्याचे सांगितले जाते. हजारो झाडे लावली गेली मात्र त्याचे पालन पोषण कसे होणार. कमीत कमी माणसांच्या उंची इतकी तरी झाडे वाढू देत. तेव्हाच पर्यावरण वाचेल. नदी, नाले सर्वावर अवैध पद्धतीने कब्जा केला जात आहे. सरकारी जमिनीवर कब्जा केला जात आहे.
संबंधित बातम्या