Trending news : झोपताना राहा सावध! माणसाच्या नाकात घुसले झुरळ! पुढे जे घडलं ते ऐकून बसेल धक्का-cockroach enters sleeping mans nose what happened next will leave you shocked ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Trending news : झोपताना राहा सावध! माणसाच्या नाकात घुसले झुरळ! पुढे जे घडलं ते ऐकून बसेल धक्का

Trending news : झोपताना राहा सावध! माणसाच्या नाकात घुसले झुरळ! पुढे जे घडलं ते ऐकून बसेल धक्का

Sep 08, 2024 12:57 PM IST

Trending news: एक व्यक्ति झोपला असतांना त्याच्या नाकात झुरळ घुसले. जेव्हा त्या व्यक्तीला आली तेव्हा त्याला नाकात आणि नंतर घशात काहीतरी रेंगाळत असल्याचं जाणवलं.

झोपताना राहा सावध! झोपेत माणसाच्या नाकात घुसले झुरळ! पुढे जे घडलं ते ऐकून बसेल धक्का
झोपताना राहा सावध! झोपेत माणसाच्या नाकात घुसले झुरळ! पुढे जे घडलं ते ऐकून बसेल धक्का (Unsplash)

Trending news: चीनच्या हेनान प्रांतातील एका ५८ वर्षीय व्यक्ती झोपला असतांना त्याच्या श्वासासोबत नकळत एक झुरळ देखील आत गेले. त्याला बरेच दिवस शरीरात त्रास होऊ लागला. मात्र, त्याला वेदना असह्य झाल्यावर त्याची तपासणी करण्यात आली तेव्हा डॉक्टरांना धक्का बसला. त्याच्या शरीरात झुरळ असल्याचं त्यांना दिसलं. तो झोपला असतांना हे झुरळ नाकावाटे त्याच्या घशात गेलं.

काय झालं माणसाचं?

रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीने झोपेत असताना नकळत श्वास घेतला. या श्वासासोबत एक झुरळ त्याच्या नाकात गेलं. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याच्या नाकात काहीतरी रेंगाळत असल्याचं त्याला जाणवलं आणि मग ते त्याच्या घशातून खाली सरकताना त्याला जाणवलं.

दुसऱ्या दिवशी त्याने या संपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, काही वेळाने त्याला त्रास होऊ लागला. व त्याच्या श्वासातून दुर्गंधी येऊ लागली. असे असतांनाही त्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. तीन दिवसांनंतरही त्याच्या श्वासातून भयंकर दुर्गंध येत असल्याचं व तोंडातून पिवळी थुंकी व खोकला येऊ लागल्याचं त्याला जाणवलं. यामुळे तो दवाखान्यात गेल्या. ऑडिटी सेंट्रलने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा हा व्यक्ती सुरुवातीला हैनान हॉस्पिटलमधील ईएनटी स्पेशालिस्टकडे गेला तेव्हा त्याला श्वसनमार्गाच्या तपासणीदरम्यान काहीही असामान्य आढळले नाही.

डॉक्टरांना झुरळ कसे सापडले?

मात्र, रुग्णाला काहीतरी गडबड असल्याची खात्री पटल्याने नंतर त्याने रुग्णालयातील श्वसन व क्रिटिकल केअर फिजिशियन डॉ. लिन लिंग यांच्याकडे स्वत:ला दाखवलं. त्यांनी छातीचा सीटी स्कॅन केला. यात त्याच्या उजव्या खालच्या लोबच्या मागच्या बेसल भागात एक सावली आढळली, ज्यावरून तेथे काही तरी असल्याचं त्यांना दिसलं. विशेष म्हणजे ती वस्तु हलत असल्याचं देखील दिसलं. यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर ब्रोन्कोस्कोपी करण्याचं ठरवलं.

या घटनेबद्दल डॉक्टर काय म्हणाले?

डॉ. लिन लिंग यांनी Seehua.com सांगितले की, "दुसर् या दिवशी ऑपरेशन दरम्यान ब्रॉन्कसमध्ये पंख असलेले काहीतरी स्पष्टपणे दिसले. हे झुरळ असल्याचं निष्पन्न झालं. झुरळ हे कफमध्ये अडकले होते. डॉक्टरांनी त्याला बाहेर काढल्यावर रुग्णाला बरं वाटू लागलं.

Whats_app_banner
विभाग