Snake Viral Video:सोशल मीडिया वर अनेक व्हिडिओ प्रतिदिन व्हायरल होत असतात. सध्या एका नागाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत की, कोब्रा एक कफ सिरपची बाटली गिळण्याचा प्रयत्न करत होता. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स वर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, फिक्कट करड्या रंगाचा कोब्रा आपल्या तोंडात मोठी बाटली दाबून बसला आहे. त्याने जवळपास संपूर्ण बाटली गिळली होती, त्याचवेळी काही स्वंयसेवकांनी तेथे पोहोचून त्याची मदत केली व बाटली तोंडातून बाहेर काढली.
व्हायरल व्हिडिओमध्ये कोब्रा हळू-हळू कफ सिरपची बाटली गिळण्याचा प्रयत्न करत आहे. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याने जवळपास संपूर्ण बाटली गिळली होती. त्यावेळी तेथे उपस्थित लोक बाटली बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. काही लोक सापाच्या तोंडात अडकलेली बाटली बाहेर काढण्यासाठी त्याला हातही लावतात. मात्र बाटली तोंडातून निघत नाही. त्यानंतर काही वेळाने लोकांच्या मदतीने सापाच्या तोंडातून बाटली बाहेर निघते.
व्हिडिओमध्ये लोक हर-हर महादेव आणि हे प्रभु बोलताना ऐकू येत आहेत. काही लोक बाटली सापाच्या तोंडातून बाहेर काढल्यानंतर टाळ्याही वाजवतात. त्यानंतर म्हणतात की, सापाच्या जवळ जाऊ नका. हा व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट सर्विसचे अधिकारी सुशांत नंदा यांनी'एक्स'अकाउंट वर पोस्ट केला आहे.
त्यांनी अनेक व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले की, 'भुवनेश्वरमध्ये एका कॉमन कोब्राने कफ सिरपची बाटली गिळली आणि ती तोंडात अडकल्यानंतर बाहेर काढण्यासाठी संघर्ष करु लागला. लोकांनी धोका पत्करून सापाच्या जबड्याचा खालचा भाग पकडून जबडा पसरत बाटलीची खालची बाजू बाहेर काढली. लोकांनी सापाचा जीव वाचवला आहे. अभिनंदन' 'सुशांत यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ अनेक वेळा पाहण्यात आला आहे. लोक सापाला जीवदान दिल्याबद्दल स्वंयसेवकांचे कौतुक करत आहेत.
एका व्यक्तिला साप चावला म्हणून त्या सापाला पकडून त्या व्यक्तीने सापालाच दोनदा चावल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. सापाला चावल्यामुळे विषाचा प्रभाव उलटेल या विश्वासाने त्या व्यक्तिने सापाला चावल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेत त्या सापाचा मृत्यू झाला असून व्यक्ती बचावला आहे.
संबंधित बातम्या