खबरदार..१६ वर्षाहून कमी वयाच्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासला जाण्यास बंदी, अन्यथा १ लाखाचा दंड-coaching centres cannot enroll students below 16 years government new guidelines ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खबरदार..१६ वर्षाहून कमी वयाच्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासला जाण्यास बंदी, अन्यथा १ लाखाचा दंड

खबरदार..१६ वर्षाहून कमी वयाच्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासला जाण्यास बंदी, अन्यथा १ लाखाचा दंड

Jan 18, 2024 11:47 PM IST

New Guidelines for coaching Class : सरकारने खासगी शिक्षण संस्थांसाठी नव्या गाइडलाइन्स जारी करत आदेश दिला आहे की, १६ वर्षाहून कमी वयाची विद्यार्थी कोचिंगला जाऊ शकणार नाहीत.

New Guidelines for coaching Class
New Guidelines for coaching Class

MoE Guidelines Coaching Centres : केंद्र सरकारने गुरुवारी मोठा निर्णय घेत कोचिंग सेंटरच्या मनमानीवर लगाम लावला आहे. सरकारने खासगी शिक्षण संस्थांसाठी नव्या गाइडलाइन्स जारी करत आदेश दिला आहे की, १६ वर्षाहून कमी वयाची विद्यार्थी कोचिंगला जाऊ शकणार नाहीत. सरकारने म्हटले आहे की, या आदेशाचे उल्लंघन केल्यास एक लाखाचा दंड आकारला जाईल. त्याचबरोबर कोचिंग सेंटरची नोंदणी रद्द केली जाईल. कोचिंग सेंटरमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या घटना समोर आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

शिक्षण मंत्रालयाद्वारे घोषित नव्या निर्देशानुसार कोचिंग सेंटरमध्ये १६ वर्षाहून कमी वयाची मुले प्रवेश घेऊ शकणार नाही. भ्रामक वादे करू शकणार नाहीत, चांगल्या रँकचे आश्वासन देऊ शकणार नाही. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोणतेही कोचिंग सेंटर पदवीहून कमी पात्रतेच्या ट्यूटर्सना नियुक्त करू शकणार नाही. संस्थान कोचिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांना तसेच पालकांना फसवे आश्वासन देऊ शकणार नाहीत. कोचिंग सेंटर कोणत्याही ट्यूटर किंवा अशा व्यक्तीची सेवा घेऊ शकत नाही जे एखाद्या गुन्ह्यात अडकले आहेत. कोणतीही  संस्था तोपर्यंत नोंदणीकृत होऊ शकत नाही, जोपर्यंत या गाईडलाईन्सचे पालन केले जाणार नाही. 

Ram Mandir: ४ तासांच्या पूजेनंतर राम लल्ला मंदिराच्या गर्भगृहात विराजमान, मूर्तीचे वजन व उंची किती?
सरकारने म्हटले आहे की, कोचिंग सेंटरकडे शिक्षकांची योग्यता, पाठ्यक्रम पूर्ण करण्याचा कालावधी, वसतिगृह सुविधा, घेण्यात येणारी फी आदिचे अपडेट विवरण आदि माहिती वेबसाईटवर द्यावी.

विविध अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी ट्यूशन फी योग्य असावी. घेण्यात आलेल्या फी ची रिसीट द्यावी. जर विद्यार्थ्याने संपूर्ण फी भरली असेल आणि मध्येच कोचिंग सोडत असेल तर विद्यार्थ्याला शिल्लक कालावधीची फी १० दिवसांच्या आत परत द्यावी.