मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nitish Kumar : नितीश कुमार यांची प्रकृती अचानक बिघडली! पाटण्यातील मेदांता रुग्णालयात दाखल

Nitish Kumar : नितीश कुमार यांची प्रकृती अचानक बिघडली! पाटण्यातील मेदांता रुग्णालयात दाखल

Jun 15, 2024 03:10 PM IST

CM Nitish Kumar admitted in Patna Hospital: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती खराब झाली असून त्यांना तातडीने पाटण्यातील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नितीश कुमार यांची प्रकृती अचानक बिघडली! पाटण्यातील मेदांता रुग्णालयात दाखल
नितीश कुमार यांची प्रकृती अचानक बिघडली! पाटण्यातील मेदांता रुग्णालयात दाखल

CM Nitish Kumar admitted in Patna Hospital: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती खराब झाली असून त्यांना तातडीने पाटण्यातील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हाताला असह्य वेदना होऊ लागल्याने त्यांना मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर ऑर्थोपेडिक्स विभागात उपचार सुरू आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. यानंतर त्यांना पाटण्यातील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या हाताला तीव्र वेदना होत होत्या. पाटणा येथील मेदांता रुग्णालयातील ऑर्थोपेडिक विभागातील डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. गेल्या काही महिन्यांपासून नितीश कुमार बराच काळ लोकसभा निवडणुकीमध्ये व्यस्त होते.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, एनडीएने भरघोस यश मिळाल्यावर त्यांनी नितीश कुमार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. एडीएचा एक महत्त्वाचा घटक म्हणून, त्यांनी त्यांचा पक्ष जेडीयू आणि केंद्र सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. या काळात त्यांनी अनेकवेळा दिल्ली वारी देखील केल्या. ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यातही ते सहभागी झाले होते.

दिल्लीहून पाटण्याला परतलेल्या नितीश कुमार यांनी शुक्रवारीच मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांचा बेरोजगारी भत्ता, घर भत्ता यासह २५ महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी मोठे निर्णय घेतले होते. जेडीयु ने २९ जून रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यासाठीची तयारीही सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांची तब्येत बिघडल्याची बातमी आली होती. असे असूनही संपूर्ण निवडणुकीत नितीश कुमार हे प्रचारात सक्रिय होते. शनिवारी नेहमीच्या कामात व्यस्त व्यस्त असतांना त्यांच्या हातात अचानक वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर