Sunita kejriwal : मुख्यमंत्री केजरिवाल यांच्या पत्नी सुनीता केजरिवाल यांनी शरद पवारांची पुण्यात घेतली भेट!-cm kejriwal wife sunita kejriwal meet sharad pawar a big political event in pune ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sunita kejriwal : मुख्यमंत्री केजरिवाल यांच्या पत्नी सुनीता केजरिवाल यांनी शरद पवारांची पुण्यात घेतली भेट!

Sunita kejriwal : मुख्यमंत्री केजरिवाल यांच्या पत्नी सुनीता केजरिवाल यांनी शरद पवारांची पुण्यात घेतली भेट!

Aug 19, 2024 07:19 AM IST

Sunita Kejriwal meets Sharad Pawar : आम आदमी पक्षाचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांच्या पत्नी सुनीता केजरिवाल यांनी पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.

Sunita Kejriwal meets Sharad Pawar : मुख्यमंत्री केजरिवाल यांच्या पत्नी सुनीता केजरिवाल यांनी शरद पवारांची पुण्यात घेतली भेट!
Sunita Kejriwal meets Sharad Pawar : मुख्यमंत्री केजरिवाल यांच्या पत्नी सुनीता केजरिवाल यांनी शरद पवारांची पुण्यात घेतली भेट!

Sunita Kejriwal meets Sharad Pawar : मध्यधोरणा प्रकरणी सध्या तिहार तुरुंगात कैद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पुण्यात मार्केटयार्ड परिसरातील कार्यालयात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत आपचे खासदार आम आमदी पक्षाचे खासदार संजय सिंह देखील उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. ही भेट विशेष होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालायत सुनीता केजरिवाल रविवारी सायंकाळी शरद पवार यांना भेटल्या. सुनीता केजरिवाल व खासदार संजय सिंह हे दोघेही दिल्लीवरून पुण्यात आले होते. या भेटीनंतर सुनीता केजरीवाल यांनी मध्यमांशी बोलणे टाळले.

राज्यात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोघांची हे भेट महत्वाची मानले जात आहे. या सोबतच आप महाविकास आघाडी सोबत लढणार की स्वतंत्र लढणार या बाबत अजून पक्षाने भूमिका स्पष्ट केली नाही. शरद पवार व सुनीता केजरीवाल यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली असून त्यांनी नेमक्या कोणत्या मुद्यांवर चर्चा केली हे स्पष्ट झालेले नाही.

स्वबळाचा दिला होता नारा

आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा दिला होता. मुंबईतील तब्बल ३६ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याच प्रीती शर्मा यांनी जाहिअर केलंन होतं. त्यामुळे या भेटीत या वरून काही चर्चा झाली का या बाबत या बाबत चर्चांना उधाण आले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल हे सध्या तिहार तुरुंगात कैद आहेत. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर आरोप असून या प्रकरणी त्यांना ईडीने सीबीआयने अटक केली आहे. त्यांनी जामीनासाठी न्यायायल्यात अर्ज केला आहे. मात्र, अद्याप त्यांना दिलासा मिळालेला नाही. दरम्यान मनीष सीसोदिया यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. अरविंद केजरिवाल यांना कधी दिलासा मिळणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.