मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIDEO : जगप्रसिद्ध मोनालिसाच्या तैलचित्रावर फेकले सूप, शेतकरी आंदोलनादरम्यान फ्रान्समध्ये गोंधळ

VIDEO : जगप्रसिद्ध मोनालिसाच्या तैलचित्रावर फेकले सूप, शेतकरी आंदोलनादरम्यान फ्रान्समध्ये गोंधळ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 28, 2024 11:55 PM IST

Monalisa Painting : पॅरिसमधील लूवर म्युझियममधील जगप्रसिद्ध मोनालिसाच्या तैलचित्रावर पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले. दोन महिला कार्यकर्त्यांनी संग्रहालयातील पेंटिंगसमोरील काचेवर सूप फेकले.

मोनालिसाच्या तैलचित्रावर पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले
मोनालिसाच्या तैलचित्रावर पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले

फ्रान्समध्ये शेतकरी आंदोलना दरम्यान लुवर म्यूजिअममध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांनी वर्ल्ड फेमस मोनालिसाच्या पेंटिंगवर सूप फेकले. पेंटिंग बुलेटप्रूफ काचेमध्ये सुरक्षितरित्या जतन करून ठेवली आहे. या पेंटींगवर सूप फेकण्यात आले. मात्र यामुळे पेंटींगला काही नुकसान झाले नाही.

आंदोलनकर्त्यांनी शेती प्रणालीत बदलाची आवश्यकता, निरोगी व शाश्वत भोजन, इंधनाच्या किंमती आदि मागणीसाठी प्रदर्शन सुरू केले आहे. घटनेनंतर म्यूजिअममध्ये तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पेंटिंग समोर काळा पडदा टाकून पेंटींग झाकले व आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली. हीघटना फॅरिसमध्ये शेतकऱ्यांच्या विरोध प्रदर्शना दरम्यान झाली. येथे इंधनाच्या वाढत्या किंमती व नियम सुरभीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.

मोनालिसाची जगप्रसिद्ध पेंटिंग १९५० च्या दशकाच्या सुरुवातीपासून काचेच्या भिंतीमध्ये ठेवण्यात आली होती. एकदा एका व्यक्तीने पेंटिंगवर ॲसिड फेकले,ज्यामुळे पेंटिंगचे नुकसान झाले. यानंतर,पुढील जतन करण्यासाठी बुलेटप्रूफ काचेमध्ये पेंटिंग बसविण्यात आली.

 

लुवर म्युझियममधील मोनालिसाच्या पेंटिंगवर हवामान बदल कार्यकर्त्यांनी हल्ला केला.दोन महिला कार्यकर्त्यांनी संग्रहालयातील पेंटिंगसमोरील काचेवर सूप फेकले. तेथील सुरक्षेला चकवा देत दोन्ही महिला पेंटिंगच्या जवळ आल्या होत्या. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोन महिला काही अंतरावरून पेंटिंगवर आधी सूप फेकताना दिसत आहेत. २०२२मध्ये एका कार्यकर्त्याने मोनालिसाच्या पेंटिंगवर केक फेकून लोकांना पृथ्वीचा विचार करा, असे आवाहन केले होते.

WhatsApp channel

विभाग