Crime: ट्युशनला जाताना अपहरण, नंतर मित्राच्या घरी नेऊन...; दहावीच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं!
Rajasthan Minor Girl Rape: राजस्थानच्या बानर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Rajasthan Rape News: राजस्थानच्या बानर जिल्ह्यात धक्कादायक शनिवारी (१६ सप्टेंबर २०२३) घटना घडली. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. पीडित मुलगी ट्यूशनला जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या आरोपीने तिला उचलून नेले. यानंतर मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम असे आरोपी तरुणाचे नाव आहे. आरोपी हा पीडितेच्या शाळेतील माजी विद्यार्थी आहे. दरम्यान, पीडिता नेहमीप्रमाणे दुपारी तीन वाजताच्या सुमारास ट्युशनला जात होती. त्यावेळी आरोपी आणि त्याचा मित्र चंद्र प्रकाश यांनी तिला रस्त्यात अडवले. यानंतर आरोपीने पीडिताला रामनगर येथील दुसऱ्या मित्राच्या घरी नेले, जिथे आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली.
पीडिताने पोलिसांना दिलेल्या माहिती असे म्हटले आहे की, आरोपी तिच्यावर बलात्कार करत असताना त्याचे दोन मित्र घराबाहेर पाहारा देत होते. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी विक्रम आणि त्याचा मित्र चंद्र प्रकाशला ताब्यात घेतले असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार
डोंबिवलीत अश्लील फोटो आई वडिलांना दाखवण्याची धमकी देत १५ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. या त्रासाला वैतागून अखेर पीडित मुलीने रामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरोधात बुधवारी तक्रार दाखल केली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.