मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  वरमाला घालताना जबरदस्तीने KISS केल्यानं घडलं ‘महाभारत’, आता त्याच वरासोबत तरुणीने पळून जाऊन केलं लग्न

वरमाला घालताना जबरदस्तीने KISS केल्यानं घडलं ‘महाभारत’, आता त्याच वरासोबत तरुणीने पळून जाऊन केलं लग्न

May 30, 2024 07:24 PM IST

Viral News : ज्या नवरदेवाने मुलीच्या कपाळाचे चुंबन घेतले होते, तरुणीला अखेर त्याच्याकडेच जावे लागले आहे. नवरी घरातून पळून तरुणीच्या घरी गेली व दोघांनी विवाह केला.

लग्नात किस घेतलेल्या नवरदेवासोबत पळली तरुणी
लग्नात किस घेतलेल्या नवरदेवासोबत पळली तरुणी

उत्तरप्रदेशातील हापुडमध्ये विवाहातील एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे काही दिवसापूर्वी मुलीच्या घरी वऱ्हाड आले होते. वऱ्हाडी मंडळींचे मुलीकडील नातेवाईकांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर विवाहाचे विधी सुरू झाले. मात्र वरमाला गळ्यात घालताना नवरदेवाने सर्वांसमोर नवरीला किस केले. हे पाहून वधू व वराकडील मंडळींमध्ये तुफान राडा झाला. लाठी-काठीने झालेल्या भांडणात अनेक जण जखमी झाले. प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले होते. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. ज्या नवरदेवाने मुलीच्या कपाळाचे चुंबन घेतले होते, तरुणीला अखेर त्याच्याकडेच जावे लागले आहे. नवरी घरातून पळून तरुणीच्या घरी गेली व दोघांनी विवाह केला. दोघे बालपणीचे मित्र असल्याचे सांगितले जात आहे. दोघे लहानपणापासून एकमेकांवर प्रेम करत होते.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे संपूर्ण प्रकार  -

मिळालेल्या माहितीनुसार, हापुड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात मोहल्ला अशोकनगर येथे २३ मे रोजी लग्न समारंभ होता. त्यावेळी वरमाला घालताना नवरदेवाने स्टेजवरच सर्वांसमोर नववधूचे चुंबन (Kiss) घेतले. (groom forcibly kissed bride) नवऱ्या मुलाच्या या कृतीने नवरीकडील मंडळी चांगलीच भडकली. त्यांनी नवऱ्या मुलासह वऱ्हाडी मंडळींना मारहाण करायला सुरूवात केली. 

पाहता पाहता लग्नाचा मंडप रणमैदान झाले व दोन्ही बाजुकडील लोक एकमेकांनी काठ्यांनी तसेच लाथा-बुक्क्यांनी मारू लागले. नवऱ्याकडील लोकांनीही काठ्या, दांडके तसेच लोखंडी बारसह दुसऱ्या बाजुच्या लोकांवर जोरदार दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात नवरी मुलीकडील जवळपास ६ जण जखमी झाले. याची माहिती मिळताच  पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दोन्ही बाजुकडील सात लोकांना ताब्यात घेतलं होतं.

लग्न समारंभात दोन बहिणींचा विवाह होता. मोठ्या बहिणीचा विवाह विनाअडथळा पार पडला मात्र छोटी बहिणीच्या नवऱ्याने सर्वांसमोर तिला किस केले. यावेळी तिची मोठी बहीणही तेथे उपस्थित होती. या घटनेनंतर दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. लग्न मंडपात दगडफेकही झाली. शेजारी असणाऱ्या लोकांनी याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणात सात जणांना ताब्यात घेतलं होते. दोन्ही बाजुंच्या लोकांची समजूत काढून प्रकरण मिटवण्यात आले. 

वऱ्हाड माघारी फिरल्यावर नवरीच्या मनात नवऱ्याप्रती प्रेम उफाळले -

वरमाला घालताना ज्या तरुणाने नवरीच्या कपाळाचे चुंबन घेतले होते, त्याच्याप्रती नवरीला प्रेम निर्माण झाले. ज्या दिवशी नवरीचा विवाह होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी ती घरातून पळून गेली व दोघांनी लग्न केले. दोघांचे घर एकमेकांच्या जवळच आहेत. तसेच दोघे एकमेकांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत. वऱ्हाड माघारी फिरल्यानंतर तरुणीने त्याच मुलाशी लग्न करण्याचा हट्ट केला व दोघांनी लग्न केले. 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग