Viral News : वरमाला घालताना नवरदेवानं जबरदस्तीनं नवरीला केलं KISS, मुलीच्या नातेवाईकांनी वऱ्हाडी मंडळींना चांगलंच बदडलं
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : वरमाला घालताना नवरदेवानं जबरदस्तीनं नवरीला केलं KISS, मुलीच्या नातेवाईकांनी वऱ्हाडी मंडळींना चांगलंच बदडलं

Viral News : वरमाला घालताना नवरदेवानं जबरदस्तीनं नवरीला केलं KISS, मुलीच्या नातेवाईकांनी वऱ्हाडी मंडळींना चांगलंच बदडलं

May 22, 2024 05:28 PM IST

Marriage Viral Video : लग्नाचे विधी सुरू असताना व वरमाळा घालताना नवरदेवानं नवरीचे जबरदस्तीने चुंबन घेतलं. यानंतर लग्नमंडपात चांगलाच राडा झाला व दोन्ही बाजुकडील लोकांमध्ये लाठी-काठ्यांनी हल्ला झाला.

वरमाला घालताना नवरदेवानं जबरदस्तीनं नवरीला केलं KISS (संग्रहित छायाचित्र)
वरमाला घालताना नवरदेवानं जबरदस्तीनं नवरीला केलं KISS (संग्रहित छायाचित्र)

यूपीमधील हापुड येथे नवरदेवानं अशी कृती केली की, लग्न मंडपात लाठ्या-काठ्या चालल्या. नवरीकडील मंडळींनी ना केवळ नवरदेवाची धुलाई केली तर वऱ्हाडी मंडळींनाही बदडून काढलं. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींकडून जोरदार दगडफेक केली गेली. या घटनेमुळे लग्न समारंभात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या घटनेत अर्धा डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हापुड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात मोहल्ला अशोकनगर येथे लग्न समारंभ सुरू होता. त्यावेळी वरमाला घालताना नवरदेवाने स्टेजवरच सर्वांसमोर नववधूचे चुंबन (Kiss) घेतले. (groom forcibly kissed bride) नवऱ्या मुलाच्या या कृतीने नवरीकडील मंडळी चांगलीच भडकली. त्यांनी नवऱ्या मुलासह वऱ्हाडी मंडळींना मारहाण करायला सुरूवात केली. 

पाहाता पाहता लग्नाचा मंडप रणमैदान झाले व दोन्ही बाजुकडील लोक एकमेकांनी काठ्यांनी तसेच लाथा-बुक्क्यांनी मारू लागले. नवऱ्याकडील लोकांनीही काठ्या, दांडके तसेच लोखंडी बारसह दुसऱ्या बाजुच्या लोकांवर जोरदार दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात नवरी मुलीकडील जवळपास ६ जण जखमी झाले आहेत. याची माहिती मिळताच  पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दोन्ही बाजुकडील सात लोकांना ताब्यात घेतलं आहे.

या घटनेनंतर वऱ्हाड नववधूला न घेताच हात हलवत परत आले. नवरीने सासरी जाण्यास नकार दिला. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. पोलिसांनी सांगितले की, शांतता भंग केल्याच्या कलम १५१ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकार?

घटनेबाबत नवरी मुलीच्या वडिलांनी सांगितले की, सोमवारी रात्री त्यांच्या दोन मुलींचे लग्न होते. मोठ्या मुलीचे गुलावती येथील मोहल्ला सुभाषनगर व लहान मुलीचे मोहल्ला शिवनगर येथून वऱ्हाड आले होते. मोठ्या मुलीचा विवाह सुभाषनगर निवासी तरुणाशी विना विघ्न पार पडले. मात्र छोट्या मुलींच्या लग्नात वरमाला घालताना मोठा गोंधळ झाला. नवऱ्या मुलाने मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे घरचे लोक संतापले व दोन्ही बाजुकडील लोकांमध्ये वादावादी सुरू झाली. 

वाद इतका विकोपाला गेला की, वराकडील मंडळींनी काठी व लोंखडी रॉडने हल्ला केला. तसेच मंडपातच जोरदार दगडफेक केली गेली. या घटनेत वधूपित्यासोबत ६ लोक गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान वऱ्हाडी नाराज होऊन परतले मात्र काही वेळानंतर त्याच मुलासोबत मुलीचा विवाह लावून देण्यात आला.

या प्रकरणी हापुडचे एसपी अभिषेक वर्मा यांनी सांगितले की, विवाह समारंभात झालेल्या वादाची माहिती मिळाली होती. याबाबत कोणत्याही बाजुकडून लेखी तक्रार मिळालेली नाही. तक्रार मिळाल्यास पुढील कारवाई केली जाईल. पोलिसांनी काही लोकांनी शांतता भंग केल्याच्या आरोपात ताब्यात घेतले आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर