इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल..? निवृत्तीआधी CJI चंद्रचूड यांना कशाची चिंता? सांगितली ‘मन की बात’
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल..? निवृत्तीआधी CJI चंद्रचूड यांना कशाची चिंता? सांगितली ‘मन की बात’

इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल..? निवृत्तीआधी CJI चंद्रचूड यांना कशाची चिंता? सांगितली ‘मन की बात’

Published Oct 09, 2024 09:21 PM IST

CJI Chandrachud : भूतान दौऱ्यावर असलेले सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, न्यायव्यवस्थेत जे करायचे होते ते त्यांनी साध्य केले का, असा प्रश्न मला अनेकदा पडतो. इतिहास आपला कार्यकाळ कसा मूल्यमापन करेल, असा प्रश्न त्यांना पडतो.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (PTI)

 सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. याआधी त्यांनी आपल्या भवितव्याबद्दल आणि भूतकाळाबद्दल चिंता आणि शंका व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले की, अनेकदा मला प्रश्न पडतो की, न्यायव्यवस्थेत आपल्याला जे करायचे होते, ते साध्य झाले का? इतिहास आपला कार्यकाळाचे मुल्यमापन कसे करेल. मात्र, या प्रश्नांची बहुतांश उत्तरे आपल्या नियंत्रणाबाहेर असून त्याची उत्तरे आपल्याला कधीच मिळणार नाहीत, अशी कबुलीही त्यांनी दिली.

भूतानमधील जिग्मे सिंग्ये वांगचुक स्कूल ऑफ लॉच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात सरन्यायाधीश चंद्रचूड बोलत होते. भूतानच्या राजकुमारी सोनम डेक्कन वांगचुक, शाळेचे अध्यक्ष ल्योन्पो चोग्याल रिग्झिन आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

इतिहास माझा कार्यकाळ कसा लक्षात ठेवेल - चंद्रचूड

चंद्रचूड म्हणाले की,  मी नोव्हेंबरमध्ये सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहे.  सध्या माझं मन भविष्य आणि भूतकाळाच्या चिंतेने भरलेलं  आहे.  मी स्वतःला प्रश्न विचारतो की, मी जे करायचे ठरवले होते ते मी केले का? इतिहास माझा कार्यकाळ कसा लक्षात ठेवेल? मी याहून काही तरी चांगलं करू शकलो असतो का? जो वारसा मी पुढच्या पिढ्यांसाठी सोडणार आहे तो कसा असेल?पण, मला माहितीये की, मागील दोन वर्षात मी सकाळी मी माझ्या कामात सर्वश्रेष्ठ योगदान देईन असे ठरवून उठतो आणि या समाधानासह झोपतो की मी माझ्या देशाची पूर्ण निष्ठेने सेवा केली आहे.

आपला दोन वर्षांचा कार्यकाळ समाधानकारक असल्याचे सांगून चंद्रचूड म्हणाले की, परिणाम काहीही झाले तरी मी नेहमीच अत्यंत निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडले आहे. जोपर्यंत तुमचा हेतू आणि क्षमतेवर विश्वास आहे, तोपर्यंत परिणामांची चिंता न करता काम करणे सोपे जाते, यावर त्यांनी भर दिला.

भारत आणि भूतानबद्दल सरन्यायाधीश चंद्रचूड काय म्हणाले?

चंद्रचूड यांनी पारंपारिक मूल्यांना मान्यता देण्याचे आणि त्यांचा आदर करण्याचे आवाहन केले. पारंपारिक मूल्ये हा भारत आणि भूतानसारख्या देशांचा पाया आहे, यावर सरन्यायाधीशांनी भर दिला. पाश्चिमात्य जगाच्या मानवी हक्कांच्या व्याख्येत अनेकदा वैयक्तिक हक्कांना प्राधान्य दिले जाते, जे कधीकधी आपल्या न्यायाच्या आकलनाशी जुळत नाही. ते म्हणाले की, भारत आणि भूतानसारख्या देशांमधील पारंपारिक सामुदायिक वाद निवारण यंत्रणा आधुनिक घटनात्मक आदर्शांशी सुसंगत असणे आवश्यक आहे.

या समारंभात सरन्यायाधीशांनी भूतानच्या पर्यावरण रक्षणाप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले आणि भारतातील पर्यावरणविषयक समस्या हाताळण्यासाठी अशा संवेदनशील आणि प्रशिक्षित वकिलांच्या गरजेवर भर दिला. कायदा हा केवळ विवादापुरता मर्यादित नसून तो सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानला गेला पाहिजे, असे ते म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर