Viral News: ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ख्रिसमस हा एक पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. मात्र, इतर धर्माचे लोक देखील हा सण उत्सवात साजरा करत असतात. जगभरात हा सण साजरा करण्यात आला. जपानच्या टोकियोमध्ये देखील लोकांनी ख्रिसमस सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात काही लोक सांताच्या वेशभुषेत 'हरे कृष्णा'च्या तालावर ख्रिसमस साजरा करताना दिसत आहेत. हे लोक इस्कॉनचे अनुयायी असल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे. 'हरे कृष्णा, हरे राम'च्या तालावर नागरिक रस्त्यावर थिरकताना या व्हिडिओत दिसत आहेत.
हा व्हिडिओ टोकियोच्या शिबुया येथील आहे. इस्कॉनचे अनुयायी 'जिंगल बेल'च्या तालावर हरे कृष्ण मंत्राचा जप करत आहेत. सांताच्या वेशातील एक व्यक्ती जमावाला हात हलवून टाळ्या वाजवताना दिसत आहे. त्याचबरोबर गाताना देखील दिसत आहे. त्यांना पाहण्यासाठी आजूबाजूला लोकांची गर्दी देखील जमल्याचे दिसत आहे.
या व्हायरल व्हिडिओवर सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने याला 'दोन धर्मांचे सुंदर मिश्रण' असे म्हटले आहे. तर एकाने लिहिले, "जपानी पुढे आहेत." एकाने लिहिले की, "जीटीए ६ पूर्वी ख्रिसमस आणि हिंदू धर्माचे हे मिलन आहे का?" इतर धर्मियांचा अपमान न करता त्याचा आदर केला जात आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर या व्हिडिओला २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
या इस्कॉन ग्रुपने हरे कृष्ण मंत्रासोबत ख्रिसमसची गाणी गाण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी व्हायरल झालेल्या एका च्या व्हिडिओंमध्येही सांता आणि एल्वेस च्या भूमिकेत अनुयायी दिसले होते. जपानच्या रस्त्यांवर ते कृष्णभजन गात होते. इस्कॉनचे अनुयायी अनेकदा आपल्या सादरीकरणाद्वारे मंदिरांच्या बांधकाम आणि देखभालीसाठी निधी गोळा करतात. शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या चौकांमध्ये किंवा स्थानिक बाजारपेठांमध्ये ते गाताना दिसतात. त्यांच्यासाठी हा एक सोपा मार्ग आहे.
संबंधित बातम्या