मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  क्रूरतेच्या सर्व सीमा पार.. पूर्ववैमस्नस्यातून एकाच्या हाताची सर्व बोटे कापली

क्रूरतेच्या सर्व सीमा पार.. पूर्ववैमस्नस्यातून एकाच्या हाताची सर्व बोटे कापली

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 25, 2023 07:36 PM IST

chopping off fingers of a man : भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आरोपीच्या चुलत भावाच्या हाताची बोटे कापल्याची खळबळजनक घटना मोहालीत घडली आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

एका व्यक्तिच्या हाताची सर्व बोटे कापल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केली आहे. सांगितले जात आहे की, पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली आहे. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी घडली असून ९ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ‘हिंदूस्तान टाइम्स मराठी’ या व्हिडिओच्या सत्यतेबाबत कोणतीही पुष्टि करत नाही. 

ट्रेंडिंग न्यूज

विशेष म्हणजे, ही घटना ८ फेब्रुवारी रोजी घडली असून, त्याच्या दुसऱ्याच दिवशी एफआयआर दाखल करण्यात आला असला तरी, या घटनेत सहभागी असलेल्या तीन आरोपींपैकी एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांकडे गुन्हेगारांचे व्हिडिओ पुरावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी घडलेली ही घटना सहा महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचा सूड म्हणून घडली आहे.

पोलिसांनी सांगितले की, बंटी नावाच्या एका व्यक्तीची बालोंगी कॉलनीत सहा महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. त्या घटनेच्या वेळी बंटीचा भाऊ गौरव उर्फ ​​गोरी तुरुंगात होता. तो नुकताच तुरुंगातून सुटला होता आणि त्याला मोहालीतील एका व्यक्तीवर संशय होता, ज्याचा त्याच्या भावाच्या हत्येशी काही संबंध असल्याचे त्याला वाटत होते.हरदीप सिंग असे बोटे कापलेल्या पीडिताचे नाव आहे. गोरीसह तिघांनी ८ फेब्रुवारी रोजी हरदीपला भेटायला बोलावले. गोरी व अन्य दोघांनी हरदीपला नंतर बडमाजरा येथील स्मशानभूमीजवळ नेले आणि तेथे त्याची धारदार शस्त्राने बोटे कापली.

मोहालीचे डेप्युटी एसपी हरिंदर सिंह मान यांनी सांगितले की, आरोपींना आपल्या भावाच्या हत्येत हरदीपच्या चुलत भावाचा सहभाग असल्याचा संशय आहे. मात्र, त्यांना तो सापडला नाही.  त्याऐवजी, ते हरदीपला बडमाजरा येथे घेऊन गेले आणि तेथे त्यांनी त्याची बोटे कापली आणि त्याला सोडून दिले. हल्लेखोरांनी हरदीपचा मोबाईलही काढून घेतला होता.हरिंदर सिंह मान यांनी सांगितले की, तीन लोकांनी एका व्यक्तीच्या हाताची सर्व बोटे कापले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपींच्या शोधात आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल.

 

IPL_Entry_Point

विभाग