ganja chocolate seized : चॉकलेटप्रेमींनो सावधान! चॉकलेटमध्ये केली जात आहे गांजाची भेसळ; 'या' नावाने होत आहे विक्री-chocolate lovers beware smugglers are mixing ganja uttar pradesh news ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ganja chocolate seized : चॉकलेटप्रेमींनो सावधान! चॉकलेटमध्ये केली जात आहे गांजाची भेसळ; 'या' नावाने होत आहे विक्री

ganja chocolate seized : चॉकलेटप्रेमींनो सावधान! चॉकलेटमध्ये केली जात आहे गांजाची भेसळ; 'या' नावाने होत आहे विक्री

Aug 19, 2024 09:36 AM IST

ganja chocolate seized : गांजा तस्करांनी चॉकलेटमध्ये गांजा मिसळून विक्री करण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 'आयुर्वेदिक औषध' या नावाने या चॉकलेटची विक्री होत होती.

ganja chocolate seized
ganja chocolate seized

ganja chocolate seized : अंमलीपदार्थांचे तस्कर आता माल विक्रीसाथी विविध क्लूत्त्या वापरतांना दिसत आहेत. गांजा विक्रीसाठी त्याची चॉकलेटमध्ये भेसळकरून विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी हैदराबादमधील एका दुकानातून गांजा भेसळयुक्त काही चॉकलेट्स जप्त केले होते. विशेष म्हणजे हे चॉकलेट आयुर्वेदिक औषधाच्या नावाने आकर्षक पॅकिंग करून विकले जात होते. गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या गांजायुक्त चॉकलेटच्या पाकीटांची तस्करी ही उत्तर प्रदेशातून करण्यात येत होती.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांनी उत्तर प्रदेशात गांजा मिश्रित चॉकलेट पकडले आहेत. 'आयुर्वेदिक औषध' नावाने या चॉकलेटची विक्री केली जात होती. ही चॉकलेट उत्तर परदेशातून हैदराबादला विक्रीसाठी पाठवली जात होती. सायबराबाद पोलिसांनी रविवारी पेटबशीराबाद येथील एका किराणा दुकानातून अमली पदार्थ असलेली चॉकलेटचा मोठा साठा जप्त केला आहे.

रिपोर्टनुसार, पॅकेटवर छापलेल्या तपशीलानुसार, प्रत्येक १०० ग्रॅम चॉकलेटमध्ये १४ ग्रॅम गांजा मिसळण्यात आला होता. सायबराबाद स्पेशल ऑपरेशन टीमच्या अधिकाऱ्यांनी कोमल किराणा दुकानावर छापा टाकला. या ठिकाणी पोलिसांना गांजा मिश्रित चॉकलेचची २०० पाकिटे सापडली आहेत. दुकानाचा मालक पिवेश पांडे हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे अपचन आणि पोटाशी संबंधित इतर समस्यांसाठी दिवसातून दोनदा ते पाण्यासोबत घेता येईल, असेही पॅकेटवर छापण्यात आले आहे. तपासादरम्यान पांडेने पोलिसांना सांगितले की, 'आयुर्वेदिक औषध' यूपीमध्ये सहज उपलब्ध आहे. तसेच ते मधुमेहाच्या उपचारासाठी देखील वापरले जाते.

या बाबत पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'स्टोअरचा मालक प्रयागराज, यूपीचा असून तो गेल्या काही वर्षांपासून येथे राहत आहे. गेल्या ६ महिन्यांपासून तो त्याच्या किराणा दुकानात हे चॉकलेट विकत होता. तेलंगणा नार्कोटिक्स ब्युरोने यूपी आणि राजस्थानमध्ये गांजा मिश्रित चॉकलेट बनवणाऱ्या अनेकांना अटक करण्यास सुरुवात केली आहे.

विभाग