No Mobile Phone Challenge: दक्षिण- पश्चिम चीनमधील एका महिलेने नुकतीच एका अनोख्या स्पर्धेत १०,००० युआन (अंदाजे १ लाख १६ हजार रुपये) जिंकले. या स्पर्धेत मोबाईलचा वापर कराण्यास बंदी असून स्पर्धकाला शांत आणि चिंतामुक्त राहून दाखवायचे होते. चोंगकिंगमधील असामान्य स्पर्धा आहे. या स्पर्धेची आता जगभरात चर्चा रंगली आहे.
चोंगकिंग येथे एका शॉपिंग सेंटरमध्ये २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत १०० अर्जदारांपैकी दहा स्पर्धकांनी सहभाग घेतला. सहभागींना मोबाइल फोन किंवा आयपॅड किंवा लॅपटॉपसारख्या इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यास मनाई होते. स्पर्धकांसमोर मोबाईलशिवाय संयमी आणि निवांत राहून दाखवचे आव्हान होते.
जिमू न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, या स्पर्धेतील नियम अत्यंत कडक होते. आयोजकांनी स्पर्धेपूर्वीच स्पर्धकांकडून त्याचे मोबाईल फोन घेतले. या ठिकाणी फक्त एक जुना मोबाईल ठेवण्यात आला, ज्याचा वापर आपत्कालीन स्थितीत करायचा होता. तसेच या फोनवरून कुटुंबातील सदस्यांशी संपर्क केला जाऊ शकतो. याशिवाय, स्पर्धकाला संपूर्ण वेळ बेडवरच काढायचा आहे. शौचालयवापरासाठी पाच मिनिटांचा ब्रेक दिला जात होता.
आयोजकांनी स्पर्धेक तणावमुक्त आहेत का? याचे परीक्षण करण्यासाठी त्यांच्या मनगटावर इलेक्ट्रीक पट्टा लावला. स्पर्धकांना झोपण्यास मनाई होती. यामुळे अनेक स्पर्धकांनी आपला वेळ पुस्तके वाचण्यात आणि बेडवर पडण्यात घालवला. स्पर्धकांना बेडवरच पाणी आणि जेवणाची व्यवस्था करून देण्यात आली होती.
ही स्पर्धा शारीरिक हालचालींपेक्षा मानसिक सहनशक्तीची होती. बारकाईने मूल्यमापन केल्यानंतर डोंग नावाची एक महिला विजयी झाली. तिने १०० पैकी ८८.९९ गुण मिळवले, बेडवर सर्वात जास्त वेळ घालवला, गाढ झोप टाळली आणि सर्वात कमी तणावमुक्त राहिली.
एका फायनान्स कंपनीत सेल्स मॅनेजर असलेल्या डोंगने १०,००० युआनचे बक्षीस जिंकले आणि चिनी सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्ध झाली. चीनी लोकांनी तिला पायजामा सिस्टर असे टोपण नाव दिले. डोंग आपल्या वैयक्तिक आयुष्यातही फोनचा फार कमी वापर करते. तिला दिवसभरातील अधिक वेळ मुलांना संभाळण्यात आणि त्यांना शिकवण्यात जातो. ज्याचा फायदा तिला या स्पर्धेत झाला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
गादी आणि बेडच्या दुकानात झालेल्या या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी स्पर्धेचे प्रायोजक असलेल्या कंपनीची ओळख आणि त्यामागचा हेतू अद्याप अस्पष्ट आहे. असे असले तरी नो-मोबाइल-फोन चॅलेंज स्पर्धेची चीनसह संपूर्ण जगभरात चर्चा रंगली आहे.
संबंधित बातम्या