मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Chinese spy vessel : भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीचा चीनला धसका; हिंद महासागरात पाठवले हेरगिरी करणारे जहाज

Chinese spy vessel : भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीचा चीनला धसका; हिंद महासागरात पाठवले हेरगिरी करणारे जहाज

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 06, 2022 02:09 PM IST

Chinese spy vessel in Indian ocean : भारत पुढील आठवड्यात ओडीशा येथील अब्दुल कलाम द्वीप समूहावरून आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचणी करणार आहे. या चाचणीवर लक्ष ठेवण्यासाठी चीनने त्यांची हेरगिरी करणारे जहाज हिंद महासागरात तैनात केले आहे.

हिंद महासागरात पाठवले हेरगिरी करणारे जहाज
हिंद महासागरात पाठवले हेरगिरी करणारे जहाज

दिल्ली : भारत आणि चीनमध्ये केवळ लडाखमध्येच नाही तर आता हिंद महासागरात देखील तणाव वाढणार आहे. लडाखच्या पूर्वेला दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने असतांना चीनने आता आणखी कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. भारत पुढील आठवड्यात ओडीशा येथील अब्दुल कलाम द्वीप समूहावरून आंतरखंडिय क्षेपणास्त्र चाचणी करणार आहे. या चाचणीवर लक्ष ठेवण्यासाठी चीनने त्यांची हेरगिरी करणारे जहाज हिंद महासागरात तैनात केले आहे. भारतीय नौदलाने चीनचे हे हेरगिरी करणारे जहाज ट्रॅक केले आहे. हे जहाज इंडोनेशिया येथील सुंडा स्ट्रेत येथे तैनात केले आहे. हेरगिरी करणारे हे जहाज चीनने या आधी ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेच्या हंबनतोटा येथील बंदरावर तैनात केले होते. युआंग वाणग ५ असे या हेरगिरी करणाऱ्या चीनी जहाजाचे नाव आहे.

तब्बल २० हजार टन वजन असणाऱ्या या जहाजावर मोठे एंटीना, अडवांन्स सेन्सर, तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे लावले आहेत. तब्बल ४०० हून अधिक क्रू मेंबर या जहाजावर आहेत. हे जहाज उपग्रह ट्रक करू शकते. तसेच त्याच्यावर नजर देखील ठेऊ शकते.

पुढील आठवड्यात भारताने भारताच्या बंगालच्या खाडीत नो फ्लाय झोन जाहीर केला आहे. ओडीशा येथील अब्दुल कलाम द्वीप समूहावरून दोन आंतरखंडिय क्षेपणास्त्र चाचणी भारत करणार आहे. १५ आणि १६ डिसेंबरला या चाचण्या होणार आहेत. भारताची सर्वात बलाढ्य अशी अग्नि ५ क्षेपणास्त्राची चाचणी केली जाणार असल्याची माहिती आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही तब्बल ५ हजर किमी पर्यन्त आहे. यामुळे ही चाचणी केली जाणार आहे. या चाचणीवर लक्ष ठेवण्यासाठी चीनने त्यांची हेरगिरी करणारे जहाज हिंद महासागरात तैनात केले आहे.

या क्षेपणास्त्राचे युजर ट्रायल हे तीन टप्यात केले जाणार आहे. अग्नि ५ हे आंतरखंडिय क्षेपणास्त्र असून या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात संपूर्ण चीन येतो. यामुळे चीन घाबरला आहे. सध्या चीनची हेरगिरी करणारी नौका ही हिंद महासागरात असल्याने भारत ही चाचणी करणार की पुढे ढकलणार हे येत्या काही दिवसांत कळणार आहे. गेल्या महिन्यात भारताने ३ हजार किमीवर मारा करू शकणाऱ्या अग्नि ३ या क्षेपणास्त्राची चाचणी केली होती.

नियमांनुसार सर्व देशांना आंतराष्ट्रीय समुद्रात नेव्हीगेशन करण्यास परवानगी आहे. यामुळे चीनच्या या हेरगिरी करण्याऱ्या जहाजाला थांबवने शक्य नाही. हे जहाज पीएलएच्या स्ट्रेटेजीक सपोर्ट टीमने पाठवले आहे. या जहाजावर सॅटेलाईट उपकरणे देखील आहेत. जे क्षेपणास्त्रांना ट्रॅक करू शकतात तसेच त्याची माहिती देखील मिळवू शकतात.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग