Chinese Pizza Hut: पिझ्झावर आतापर्यंत विविध प्रयोग पाहिले असतील. मात्र, या बाबतीत चीन आता एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला आहे. मांसाहारी पदार्थ खाण्यावरून नेहमी चर्चेत असलेल्या चीनमध्ये असा पिझ्झा सर्व्ह केला जात आहे की, त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. चीनमध्ये पिझ्झा हट कंपनीने एक नवीन पिझ्झा लॉन्च केला आहे, ज्यामध्ये टॉपिंगवर संपूर्ण डीप फ्राईड बेडूक सर्व्ह केले जातील. मदरशिप या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, पिझ्झा हट हा चीनच्या 'गोब्लिन पिझ्झा'वर चढणारा डीप फ्राईड बुलफ्रॉग आहे. या पिझ्झाची किंमत १६९ युआन म्हणजेच जवळपास २ हजार रुपये ठेवण्यात आली आहे.
पिझ्झा चेनने १८ नोव्हेंबर रोजी वीचॅट पोस्टद्वारे डिशची घोषणा केली. हा पिझ्झा निवडक आउटलेटवरून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. हे संपूर्ण बुलफ्रॉग आणि कोथिंबीरसह सर्व्ह केले जाते. एका पिझ्झा ऑर्डररने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पिझ्झाचा फोटो पोस्ट करत लिहिले की, ‘बेडूक पिझ्झा चीनमध्ये भेटतो. तुम्ही ट्राय करण्यासाठी तयार आहात की तुम्हाला पिझ्झावर अननस हवंय.'
या पोस्टवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘मला आश्चर्य वाटते की इटलीचे लोक हे पाहिल्यावर काय विचार करतील.’ आणखी एका युजरने लिहिले की, 'बघूनच किळसवाणे वाटत आहे. किती भयंकर प्रकार आहे. दरम्यान, अनेकजण बेडूकाचे मांस हे चवीला चिकन आणि फिश मीटसारखेच असल्याचे बोलत आहेत.