Chinese Mukbang Streamer Pan Xiaoting Passes Away: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काय करतील? याचा काही नेम नाही. अशाच प्रयत्नात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला. संबंधित तरुणी सर्वात जास्त जेवायची पैज लावून लोकांचे मनोरंजन करायची. मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी दररोज १० किलो जेवायची. जेवणाच्या स्पर्धेत तिने अनेक बक्षीस जिंकले. मात्र, एकदिवस हा प्रयोग तिच्या जीवा बेतेल, याची तिने कधीच कल्पनाही केली नसेल.
हे प्रकरण चीनचे आहे. पॅन जियाओटिंग असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहेत. ही तरुणी फक्त २४ वर्षांची आहे. फूडशी संबंधित चॅलेंज स्वीकारून पॅनने खूप प्रसिद्धी मिळवली. मिळालेल्या माहितीनुसार, पॅनने १४ जुलै रोजी असेच चॅलेंज स्वीकारून अन्न खाते, ज्याचे सोशल मीडियावर थेट प्रक्षेपणही केले जात होते. हे चॅलेंज जिंकणाऱ्यांना सन्मान, पुरस्कार आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळणार होती. यासाठी पॅनने आपला जीव धोक्यात घालून स्पर्धेत भाग घेतला आणि बक्षीसही जिंकले. पण तिने कधीच विचारही केला नसेल की, हे बक्षीस तिच्या आयुष्यातील शेवटचे बक्षीस ठरेल.या चॅलेंजला मुकबांग म्हणतात. मुलीच्या आई-वडिलांनी तिला इतके खाण्यास मनाई केली होती, पण तिने त्यांचे ऐकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पॅन जियाओटिंग ही एका वेळी चक्क १० किलोपेक्षा जास्त जेवण जेवायची. इतके खाऊन झाल्यावर आता जेवता येणार नाही असे ती कधीच म्हणाली नाही. इतके खाल्ल्यावर तिला भीती वाटत नव्हती तर, स्वत:चा अभिमान वाटत असे. पॅन जियाओटिंग ही एक वेटर होती. जेव्हा तिने तिच्या एका मैत्रिणीला मुकबांग करून जास्त पैसे कमावताना पाहिले तेव्हा तिनेही अशाच पद्धतीने पैसे कमावयाचे ठरवले. सुरुवातीला ती मोजक्या लोकांसोबत किंवा कॅमेरासोबत एकटीच जेवत असे, पण हळूहळू तिचे मनोबल वाढत गेले. मात्र, आता त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येत आहे.
संबंधित बातम्या