China Viral News: सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन लाच घेतल्याचे अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, चीनमधील एका महिला अधिकाऱ्यावर असे काही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत की, ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असलेल्या संबंधित महिला अधिकाऱ्यावर ५० हून अधिक कर्मचाऱ्यांसोबत शाररिक संबंध ठेवल्याचे आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झोंग यांग असे या माजी महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. झोंग यांग हीचे अनेक कर्मचाऱ्यांशी लैंगिक संबंध असल्याचे तिच्यावर आरोप झाले. त्यानंतर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तिची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. तसेच तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या महिलेबाबत आता जी माहिती समोर आली आहे, ती खरोखरच आश्चर्यचकित करणारी आहे.
झोंग यांगने ५८ कर्मचाऱ्यांशी गैरव्यवहार करत त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. एवढेच नव्हेतर, तिने सुमारे ६० दशलक्ष युआन म्हणजेच ७१ कोटी रुपयांची लाच देखील घेतल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी तिला १३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली असून एक कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
एससीएमपीच्या म्हणण्यानुसार, झोंगचे ५८ जणांसोबत संबंध होते. अनेकदा ती खाजगी नाईटक्लबमध्ये दिसली. महत्त्वाचे म्हणजे, तिच्या हँडबॅगमध्ये नेहमीच कंडोम असायचे, असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तिच्यावर झालेल्या आरोपानंतर तिला चौकशीला सामोरे जावा लागले. चौकशीदरम्यान, झोंगवरील आरोप सिद्ध झाले. यानंतर तिला शिक्षा सुनावण्यात आली.
यांग ही गुइझोउ प्रांतातील कियानन बुयेई आणि मियाओ स्वायत्त प्रीफेक्चरचे राज्यपाल आणि उपसचिव म्हणून काम करत होते. यांग हीने वयाच्या २२ व्या वर्षी चीनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला आणि राजकारणाला सुरुवात केली. यांग यांनी नंतर नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. गेल्या वर्षीच तिला राज्यपालपदावरून हटवण्यात आले.