Viral News : आई- वडील गोरे, मग त्यांचं मूल काळं का? डॉक्टरांनी शोधून काढलं यामागचं कारण!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : आई- वडील गोरे, मग त्यांचं मूल काळं का? डॉक्टरांनी शोधून काढलं यामागचं कारण!

Viral News : आई- वडील गोरे, मग त्यांचं मूल काळं का? डॉक्टरांनी शोधून काढलं यामागचं कारण!

Updated Nov 12, 2024 01:02 PM IST

China Viral News: चीनमध्ये एका महिलेने काळ्या मुलाला जन्म दिला, त्यानंतर तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला.

आई- वडील गोरे, मग त्यांचं मूल काळे का?
आई- वडील गोरे, मग त्यांचं मूल काळे का?

China News: चीनमधील एका ३० वर्षीय महिलेने काळ्या मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्या पतीने तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आई- वडील गोरे असताना जन्माला आलेले मूल काळे का? असा प्रश्न महिलेच्या पतीने उपस्थित केला. ही गोष्ट जेव्हा चर्चेत आली तेव्हा, अनेकांनी या महिलेला पितृत्व चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला. मात्र, डॉक्टरांच्या एका टीमने यामागचे कारण शोधून काढले आहे.

चायना टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शांघायमधील रुग्णालयात एका महिलेने सिझेरियन सेक्शनद्वारे मुलाला जन्म दिला. मात्र, जेव्हा तिच्या पतीने आपल्या मुलाला पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. कारण या मुलाचा रंग आई-वडिलांपेक्षा खूप वेगळा होता. या बाळाची त्वचा एखाद्या अफ्रिकन लोकांसारखी होती. महिलेने सांगितले की, मी कोणत्याही काळ्या माणसाला ओळखत नाही. मात्र, तरीही माझ्या पतीने घटस्फोट घेतला.

डॉक्टर काय म्हणाले?

नवजात मुलांसोबत असे होऊ शकते आणि वेळेसह मुलांच्या त्वचेचा रंग बदलतो. अनेक नवजात बालकांची त्वचा गडद किंवा लाल असते.एका वैद्यकीय पथकाने सांगितले की, 'खराब ब्लड सर्कुलेशनमुळे काही वेळा नवजात मुलांची त्वचा गडद लाल असते, ज्यात वेळेनुसार बदल होतो.' पुढे डॉक्टरांनी असेही सांगितले की, ‘नवजात बाळाची त्वचा सामान्यतः गडद लाल किंवा जांभळ्या रंगाची असते. नवजात बाळ श्वास घेत असताना त्याच्या त्वचेचा रंग बदलणे सामन्य गोष्ट आहे. बाळ जन्मताच त्याची त्वचा लाल असते आणि हळूहळू लालसरपणा कमी होत जातो. महत्त्वाचे म्हणजे, पहिल्या ३ ते ६ महिन्यात मुलाच्या त्वचेचा खरा रंग समजतो.’

पतीच्या मृत्यूनंतर १६ महिन्यांनी महिलेने दिला बाळाला जन्म

भारतीय वंशाच्या एका ब्रिटीश महिलेने पतीच्या मृत्यूच्या १६ महिन्यांनंतर बाळाला जन्म दिला. या महिलेने आयव्हीएफच्या मदतीने दुसऱ्या मुलाला जन्म दिला.जसदीप सुमल असे या महिलेचे नाव असून तिचा पती अमन सुमल यांचे ब्रेन ट्युमरमुळे निधन झाले. चक्कर आणि डोकेदुखीचा त्रास झाल्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये अमनला ग्रेड चार ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले. त्यांनी केमोथेरपी आणि गहन रेडिओथेरपी घेतली पण त्यांची प्रकृती सतत खालावत गेली आणि डिसेंबर २०२१ मध्ये वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर