Viral News : तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत चीन जगात आघाडीवर मानला जातो. मात्र, चीनमधील नानिंग शहरात असे काही घडले की या घटनेमुळे चीनचं सर्व जगात हसू होत आहे. चीनमधील नॅनिंगमध्ये नुकतीच बसवण्यात आलेली मानवी विष्ठा आणि मन मूत्र वाहून नेणाऱ्या पाइप लाइन प्रेशर चाचणीदरम्यान फुटली. या घटनेत मानवी मलमूत्र तब्बल ३३ फूट हवेत उडाले. आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर आणि गाड्यांवर पडले. काही कारच्या विंडस्क्रीनला तर तडे गेले. दुर्गंधीयुक्त स्फोटानंतर नागरिक हैराण झाले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
हा व्हिडिओ शेअर करताना एका व्यक्तीने लिहिलं की, रस्त्यावर सर्वत्र मानवी विष्ठा पसरली आहे. नानिंगमधील सांडपाणी पाईपच्या दाब चाचणीदरम्यान हा प्रकार घडला. ही पाइपलाइन फुटून हवेत मानवी विष्ठा उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, ही सीवेज लाईन नुकतीच बांधण्यात आली होती. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही पाइपलाइन फुटली. या पाइपलाइनचे काही काम सुरू होते.
अभियंते सीवेज लाइनच्या दाबाची चाचणी घेत असल्याचे सांगण्यात आले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. घटनेनंतर संबंधित अधिकारी व कर्मचारी तातडीने तेथे पोहोचले. त्यानंतर स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. एका व्यक्तीने सोशल मीडियावर लिहिले, मी पूर्णपणे विष्ठेने भिजलो होतो. माझ्या कारची विंडशील्ड देखील घाणीने पिवळी झाली. परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक चीनमधील भ्रष्टाचारावरही बोलत आहेत. काहीनी म्हटलं आहे की पायाभूत सुविधांच्या विकासाच्या आंधळ्या शर्यतीत चीन दर्जेदार कामं करायला विसरला आहे. काहींनी या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंताही व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अशा प्रकारे गटार फुटल्याने रोगराई पसरू शकते. धोकादायक जीवाणू त्यांचा प्रभाव दाखवतील.
इस्रायलने मोडलं हिजबुल्लाचं कंबरडं! टॉप कमांडरची केली हत्या; आतापर्यंत 'या' नेत्यांना संपवलं