लसणांच्या माध्यमातून चीनचा विषारी खेळ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात; भारतासह अनेक देश ड्रॅगनच्या टार्गेटवर-china poisonous game through garlic is playing with peoples health many countries including india on target ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लसणांच्या माध्यमातून चीनचा विषारी खेळ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात; भारतासह अनेक देश ड्रॅगनच्या टार्गेटवर

लसणांच्या माध्यमातून चीनचा विषारी खेळ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात; भारतासह अनेक देश ड्रॅगनच्या टार्गेटवर

Sep 13, 2024 03:26 PM IST

Chinese garlic : देशी लसणाच्या वाढत्या किमतींचा फायदा घेत चीनने गुपचूप आपल्या विषारी लसणाची भारतीय बाजारपेठेत घुसखोरी सुरू केली आहे.

लसणाच्या माध्यमातून चीनचा विषारी खेळ
लसणाच्या माध्यमातून चीनचा विषारी खेळ

चीनमधून येणारा खराब आणि विषारी लसूण पुन्हा एकदा भारतासह अनेक देशांमध्ये पसरत आहे. हा लसूण लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करतो. देशी लसणाच्या वाढत्या किमतीचा फायदा घेत चीनने गुपचूप आपला विषारी लसूण भारतीय बाजारपेठेत आणायला सुरुवात केली आहे. हा लसूण केवळ आरोग्यासाठीच धोकादायक नाही तर भारतातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे.

भारताने २०१४ मध्ये चीनमधून लसूण आयातीवर बंदी घातली होती. असे असूनही चीनमधील विषारी लसूण भारतीय बाजारपेठेत गुपचूप विकला जात आहे. नुकताच गुजरातमधील 'गोंडल कृषी उत्पन्न' बाजारातून ७५० किलो चायनीज लसूण जप्त करण्यात आला. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी तात्काळ राज्य व केंद्र सरकारला माहिती दिली. हा विषारी लसूण लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चीनच्या विषारी लसणाचा आरोग्यवर दुष्परिणाम -

चीनमधून येणाऱ्या लसूणमध्ये मेटाइल ब्रोमाइड नावाचे विषारी रसायन वापरले जाते. लसूण बुरशीपासून वाचवण्यासाठी हे रसायन लावले जाते आणि ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्याच्या दीर्घकालीन सेवनामुळे यकृत, मूत्रपिंड आणि मज्जातंतूच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय दृष्टी कमी होणे आणि इतर गंभीर आजारही होऊ शकतात.

भारत आणि चीन हे दोन्ही देश लसणाचे प्रमुख उत्पादक आहेत, परंतु चिनी लसूणमध्ये असलेली हानिकारक रसायने आणि त्याचा निकृष्ट दर्जा यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची मागणी घटली आहे. याउलट देशांतर्गत आणि बाह्य बाजारपेठेत भारतीय देशी लसणाची मागणी वाढत आहे. विशेषत: मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून पिकवला जाणारा लसूण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लोकप्रिय होत आहे. चीन आता आपला विषारी लसूण भारतीय बाजारपेठेत स्वस्त दरात पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून आपली पकड पुन्हा मिळवता येईल.

नेपाळमार्गे भारतात येणारा १६ टन चिनी लसूण सीमा शुल्क विभागाने नुकताच जप्त केला. विभागाने आतापर्यंत १४०० क्विंटल विषारी चायनीज लसूण नष्ट केला आहे. लसणाच्या या विषारी खेळाला आळा घालण्यासाठी सरकार आणि संबंधित विभाग सातत्याने प्रयत्न करत असले तरी अजूनही काळाबाजार सुरूच आहे.

Whats_app_banner
विभाग