Viral News: लॉटरी जिंकण्यासाठी तरुणानं लढवली 'अशी' शक्कल, रातोरात बनला २८ कोटींचा मालक!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: लॉटरी जिंकण्यासाठी तरुणानं लढवली 'अशी' शक्कल, रातोरात बनला २८ कोटींचा मालक!

Viral News: लॉटरी जिंकण्यासाठी तरुणानं लढवली 'अशी' शक्कल, रातोरात बनला २८ कोटींचा मालक!

Published Oct 04, 2024 10:44 AM IST

lottery ticket winning tricks: लॉटरी जिंकण्यासाठी तरुणानं लढवलेली शक्कल अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

लॉटरी जिंकण्यासाठी तरुणानं लढवली अनोखी शक्कल
लॉटरी जिंकण्यासाठी तरुणानं लढवली अनोखी शक्कल

China Man wins lottery tickets: कधी कोणाचे भाग्य पलटेल कोणी सांगू शकत नाही आणि कधीकधी आपल्या कानावर अश्या काही गोष्टी येत असतात ज्यावर आपला विश्वास बसत नाही. चीनमध्ये अशीच एक घटना घडली आहे, जो रातोरात २८ कोटींचा मालक बनला. संबंधित व्यक्ती अनेक वर्षांपासून लॉटरीचे तिकीट विकत घ्यायचा. परंतु, कधीच त्याला लॉटरी लागली नाही. यानंतर या व्यक्तीला लॉटरीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. ज्यामुळे तो करोडपती बनला.

दरम्यान, १० सप्टेंबर २०२४ रोजी डबल कलर बॉल नावाच्या लॉटरी संस्थेने प्रथम पारितोषिक विजेत्याची घोषणा केली तेव्हा या व्यक्तीच्या घरात आनंदोत्सव झाला. त्यानंतर चीनी व्यक्तीचे आयुष्य बदलले. त्याच्या भावना बदलल्या आणि त्याची परिस्थिती देखील बदलली. या लॉटरीचा विजेता दुसरा कोणी नसून मध्य चीनमधील हेफेई येथील एक व्यक्ती आहे.

कोणताही लोभ न ठेवता तिकीटांची खरेदी

लॉटरी जिंकलेल्या व्यक्तीने सांगितले की, ‘तो गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून लॉटरीचे तिकीट खरेदी करतो. परंतु, त्याने कधीच लॉटरीवर २५० रुपयांपेक्षा जास्त खर्च केला नाही. तसेच तो कधीतरी लॉटरी जिंकेल, असेही त्याने डोक्यात ठेवले नाही. मी फक्त एक ग्राहक म्हणून लॉटरीचे तिकीट खरेदी केले. जिंकलो ती एक वेगळी गोष्ट आहे.’

बक्षीसातील रक्कमेतून ११ कोटी दान

पुढे तो म्हणाला की, जेव्हा त्याने पहिल्यांदा लॉटरी खेळायला सुरुवात केली, तेव्हा तो आवडीचे नंबर निवडायचा. मात्र, काही दिवसांनी त्याने एका लॉटरी विजेत्या व्यक्तीची कथा वाचली, जो कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसाशी संबंधित लॉटरीचे तिकीट निवडायचा. यानंतर या व्यक्तीनेही अशाच पद्धतीने लॉटरीचे तिकीट खरेदी करण्याचे ठरवले. काही दिवसांपूर्वी त्याने ११९ रुपयांचे तिकीट खरेदी केले, ज्यामुळे तो २८ कोटींचा मालक बनला. यातील त्याने ११ कोटी रुपये दान केल्याचे बोलले जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर