भरधाव कार स्पोर्ट्स सेंटर बाहेर शेकडोंच्या गर्दीत घुसली; ३५ जणांचा मृत्यू, ४३ जखमी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भरधाव कार स्पोर्ट्स सेंटर बाहेर शेकडोंच्या गर्दीत घुसली; ३५ जणांचा मृत्यू, ४३ जखमी

भरधाव कार स्पोर्ट्स सेंटर बाहेर शेकडोंच्या गर्दीत घुसली; ३५ जणांचा मृत्यू, ४३ जखमी

Nov 12, 2024 07:20 PM IST

China Accident : चीनच्या झुहाई शहरात एका क्रीडा केंद्रात व्यायाम करणाऱ्या शेकडो लोकांच्या गर्दीत एका विक्षिप्त ड्रायव्हरने कार चालवली. या दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू झाला होता.

चीनमध्ये मोठा अपघात
चीनमध्ये मोठा अपघात

चीनमध्ये हिट अँड रनची एक भयानक घटना समोर आली आहे. चीनमध्ये एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एका कार्यक्रमावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या गर्दीमध्ये भरधाव कार घुसली. या भीषण अपघातात तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४३ जण जखमी झाले आहेत. 

दक्षिण चीनमधील झुहाई शहरात हा अपघात घडली. येथील एका क्रीडा केंद्रात व्यायाम करणाऱ्या शेकडो लोकांच्या गर्दीवर एका विक्षिप्त ड्रायव्हरने कार घुसवली. या दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू झाला असून ४३ हून अधिक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे. हा अपघात होता की हल्ल्याचा कट होता, याचा शोध पोलिस अधिकारी घेत आहेत.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) आयोजित केलेल्या झुहाई एअरशोच्या एक दिवस आधी सोमवारी ही घटना घडली. एपीने दिलेल्या वृत्तानुसार, चालकाचे नाव फॅन (वय ६२) असे आहे. झुहाई येथील शांग चोंग रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की,  काही जखमी लोक उपचारानंतर निघून गेले आहेत.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अग्निशमन दलाचा जवान जखमी व्यक्तीवर सीपीआर करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये डझनभर लोक क्रीडा केंद्राच्या धावत्या ट्रॅकवर बेशुद्धावस्थेत पडले होते. जखमींपैकी एक महिला ओरडत आहे, "माझा पाय तुटला आहे.

एपीने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी रात्रीच्या घटनेबाबत चीनी माध्यमांनी लिहिलेले लेख काढून टाकण्यात आले आहेत. झियांगझोऊ जिल्ह्यातील झुहाई शहर क्रीडा केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे लोक ट्रॅक ग्राऊंडवर धावतात, फुटबॉल खेळतात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतात.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर