Human Metapneumo Virus : कोरोना महामारीची सुरुवात चीनमध्ये झाली. आता पाच वर्षांनंतर चीनमध्ये आणखी एका धोकादायक विषाणूने हाहाकार माजवला आहे. ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) असे या विषाणूचे नाव आहे. कोरोना व्हायरस इतकाच हा संसर्गजन्य आणि जीवघेणा असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. काही रिपोर्ट आणि सोशल मीडिया पोस्ट्सवरून असे दिसून येते की, चीनमध्येही अनेक व्हायरसचा हल्ला झाला आहे. इन्फ्लूएन्झा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-१९ विषाणू वेगाने पसरत आहेत. रुग्णालये आणि स्मशानभूमीत गर्दी दिसून येत आहे.
चीन आणीबाणीसदृश स्थितीत आल्याचा दावाही केला जात असला तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. एचएमपीव्ही फ्लूमध्ये कोरोना व्हायरससारखीच लक्षणे आहेत. या विषाणूच्या प्रादुर्भावानंतर आरोग्य अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. याला सामान्य भाषेत गूढ न्यूमोनिया देखील म्हणता येईल.
''SARS-CoV-2 (कोविड-19))' नावाच्या एक्स हँडलने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "चीनमध्ये इन्फ्लूएंझा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड -१९ सह अनेक विषाणूंमध्ये वाढ होत आहे. यामुळे रुग्णालये आणि स्मशानभूमीत गर्दी झाली आहे. चीनमधील मुले न्यूमोनिया आणि "व्हाइट लंग" आजारांनी ग्रस्त आहेत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या रोग नियंत्रण प्राधिकरणाने शुक्रवारी सांगितले की ते रहस्यमय न्यूमोनियाच्या प्रकरणांचा बारकाईने अभ्यास करीत आहेत. यामुळे अनेकदा हिवाळ्यात श्वसनाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते.
प्रकरणाशी परिचित असलेल्यांनी सांगितले की, विविध अभ्यासातून असे दिसून आले आहे की हा विषाणू कमीतकमी सहा दशकांपासून अस्तित्वात आहे. श्वसनाचा आजार म्हणून तो जगभर पसरला आहे. हे प्रामुख्याने खोकला आणि शिंकण्यामुळे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कामुळे किंवा दूषित वातावरणामुळे देखील संसर्ग होऊ शकतो. त्याचा परिणाम तीन ते पाच दिवसांत दिसू लागतो.
चीनने गुरुवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, १६ ते २२ डिसेंबर दरम्यान श्वसनाच्या समस्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. आरोग्य अधिकारी कान बियाओ यांनी सांगितले की, चीनमध्ये हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये श्वसनाचे विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकूण रुग्णसंख्या कमी असेल की नाही, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
संबंधित बातम्या