मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  China Earthquake : चीनमध्ये विनाशकारी भूकंप! ६.२ रिश्टर स्केलची तीव्रता, तब्बल १११ नागरिकांचा मृत्यू

China Earthquake : चीनमध्ये विनाशकारी भूकंप! ६.२ रिश्टर स्केलची तीव्रता, तब्बल १११ नागरिकांचा मृत्यू

Dec 19, 2023 07:33 AM IST

China Earthquake : चीनमध्ये सोमवारी रात्री उशिरा वायव्य चीनमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून तब्बल १११ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो.

China Earthquake
China Earthquake

China Earthquake : चीनच्या गान्सू प्रांतात सोमवारी रात्री मोठा भूकंप झाला. तब्बल ६.२ रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता मोजली गेली. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने (CENC) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास उत्तर-पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतात हा भूकंप झाला. या भूकंपामुळे गान्सू येथे अनेक इमारती कोसळल्या. चीनच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार, गांसू आणि किंघाई प्रांतात झालेल्या या भूकंपामुळे १११ नागरिकांचा मृत्यू झाला तर २३० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सोमवारी रात्री उशिरा वायव्य चीनमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ इतकी होती. भूकंप इतका शक्तिशाली होता की त्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. या घटनेत १११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. चीनच्या विनाशकारी भूकंपाची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कोसळलेल्या इमारती आणि त्यांचा ढिगारा दिसत आहेत. पाकिस्तानपर्यंत हे भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे.

Coronavirus News : सावधान कोरोना डोकं वर काढतोय! केरळमध्ये एकाच दिवशी १११ बाधित; केंद्र सरकारने दिले महत्त्वाचे निर्देश

चीनच्या सरकारी माध्यमांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, गान्सू प्रांतात सोमवारी रात्री ११.५९ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिअॅक्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.२ होती. उत्तर-पश्चिम चीनमध्ये भूकंपामुळे इमारती कोसळून अनेक नागरीक ठार झाले. बचाव कर्मचारी ढिगाऱ्यातून खोदत नागरिकांना बाहेर काढत होते. शेजारच्या किंघाई प्रांतातील हैदोंग शहरात झालेल्या भूकंपात आणखी ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर १०० जण जखमी झाले आहेत. राज्य वृत्तसंस्था शिन्हुआच्या माहितीनुसार, भूकंपामुळे घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. सोशल मीडियावर लोक आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धावताना दिसत आहेत .

बचावकार्य सुरू, मृतांचा आकडा वाढू शकतो

मंगळवारपासूनच मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लोकांना शांतता आणि सहकार्य राखण्याचे आवाहन केले आहे. शोध आणि मदत कार्य वाचलेल्यांची आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करेल, असे आश्वासन जिनपिंग यांनी दिले.

भूकंपामुळे सर्वात जास्त नुकसान काउंटी, डियाओजी आणि किंघाई प्रांतात झालं आहे. येथील अनेक इमारती कोसळल्यामुळे लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत, सीईएनसीनं सांगितलं की, भूकंपाचा केंद्रबिंदू ३५.७ अंश उत्तर अक्षांश आणि १०२.७९ अंश पूर्व रेखांशावर १० किलोमीटर खोलीवर नोंदवला गेला. चीनचे राष्ट्रीय आपत्ती निवारण, शमन आणि मदत आयोग आणि आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने स्तर-IV आपत्ती निवारण आणीबाणी जाहीर केली आहे. मात्र, या ठिकाणी कडाक्याची थंडी असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर