Toddler Viral Video : तामिळनाडू राज्यातील चेन्नईमधील एका अपार्टमेंटमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एक बालक खाली कोसळणार असते तेव्हा 'चमत्कार' झाला व मुलाचा जीव वाचला. हा व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत.
बाल्कनीमधून बालक प्लास्टिक शीटपर्यंत आले होते. हळू -हळू ते खाली पडत होते. परिसरातील लोकांनी पाहून त्यांनी बाळाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. लोकांनी इमारतीच्या खाली चादर पसरून ठेवली. जेणेकरून जर बालक कोसळले तर त्याला वाचवले जाऊ शकेल. दरम्यान पहिल्या मजल्यावरून काही लोकांनी बालकाला सुखरुप वाचवले.
कसा वाचवला मुलाचा जीव -
जवळपास तीन मिनिटांचा हा व्हिडिओ अपार्टमेंटच्या समोरील टॉवरमधून बनवण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एक लहान मूल प्लास्टिक शीटवरून हळू-हळू खाली पडत आहे. जमिनीवर काही लोक चादर पसरून उभे आहेत. मात्र काही वेळाने मोठी बेडशीड आणली जाते. दरम्यान पहिल्या मजल्यावरील लोकही सतर्क होतात.
तेथून एक व्यक्ती खिडकीतून बाहेर योते. त्यानंतर आणखी एक व्यक्ती खिडकीतून बाहेर येते. बालक हुळ-हळू खाली सरकत असते. त्यानंतर खिड़कीतून आलेल्या व्यक्तीने बाळाला खाली कोसळण्यापूर्वीच आपल्या हाताने सुखरुप वाचवले. सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मुलाला वाचवण्याचे सर्वत्र कौतुक -
जितक्या वेळ बालक प्लास्टिक शीटवर होते. त्या वेळापर्यंत लोकांनी श्वास रोखून धरले होते. त्यानंतर बाळाला सुखरुप खाली उतरवल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर हसू पसरले. व्हिडिओ पाहून सोशल मीडिया प्लेटफॉर्म' एक्स'वर एका यूजरने कमेंट केली आहे की, देव तारी त्याला कोण मारी, ईश्वर महान आहे. अन्य काही लोकांनी मुलाचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एक एसके नावाच्या यूजरने म्हटले की, हे मी पाहू शकत नाही, मला तर हार्ट अटॅक येईल. दरम्यान एकाने प्रश्न उपस्थित केला आहे की, बालक तेथे जात असताना त्याचे पालक कोठे होते व काय करत होते?